CM Vijay | तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) टीव्हीकेची (TVK) सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री जोसेफ विजय (CM Joseph Vijay) यांनी जनतेच्या हिताच्या अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आताही मुख्यमंत्री विजय यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता तामिळनाडूतील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण मुख्यमंत्री विजय यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली आहे.
हेही वाचा – “AI वर बकरीचा बळी द्या अन्….”; बकरी ईदपूर्वी नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य, राजकारण तापलं
मुख्यमंत्री विजय यांनी शेतकऱ्यांसाठी केली कर्जमाफीची घोषणा
मुख्यमंत्री विजय यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकेच्या 50,000 रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी जाहीर केली आहे. तसेच मोठ्या शेतकऱ्यांचेही पाच हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. या घोषणेमुळे तामिळनाडूतील 14,22,000 शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कर्जमाफीची घोषणा करताना विजय सरकारने म्हटलं आहे की, 2,044 कोटी रुपये ही रक्कम थेट सहकारी बँकांमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या नावावर कोणतीही थकबाकी राहणार नाही. विजय सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हवामान किंवा बाजारातील अनिश्चिततेमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी केलेल्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकरी नेते या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
तामिळनाडू सरकार लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार. तसेच या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची खात्री करण्यासाठी, पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.












