Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राष्ट्रवादीत अंतर्गतची चर्चा वाढल्या; प्रफुल पटेल बैठकीस गैरहजर; नेमकं काय घडलं?
Mumbai

राष्ट्रवादीत अंतर्गतची चर्चा वाढल्या; प्रफुल पटेल बैठकीस गैरहजर; नेमकं काय घडलं?

NCP Internal Conflict: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या महत्वाच्या बैठकीत अंतर्गत मतभेद आणि नाराजी स्प्ष्टपणे समोर आल्याचं चित्र दिसून आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली.

बैठकीत खासदार सुनील तटकरी ( Sunil Tatkare) यांनी पक्षात त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने होत असलेल्या टीकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षातील इतर नेते आपल्याला उघडपणे पाठिंबा देत नसल्याची खंतही त्यांनी मांडली. तसेच या टीकेवर पक्ष नेतृत्व स्पष्ट भूमिका घेणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: भाजपची 17 पैकी बहुतांश जागांवर पकड; महायुतीत जागावाटपावरून तणाव, कोणाला किती वाटा?

प्रफुल पटेल बैठकीला गैरहजर

दरम्यान, मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं. त्याचवेळी पार्थ पवार (Parth Pawar) यांनी सुनील तटकरे बोलण्याआधीच बैठकीतून बाहेर पडल्याचं समोर आलं, ज्यामुळे बैठकीतील वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं.

याच बैठकीत मंत्री छगन भुजबल(Chhagan Bhujbal) आणि सुनील तटकरे यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याची चर्चा रंगली. तटकरे बोलत असताना भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नंतर छगन भुजबळ यांनी कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा पसरवू नयेत, असं आवाहन केलं.

पक्षात मतभेद

पक्षाच्या 10 जून रोजी होणाऱ्या स्थापना मेळाव्याच्या ठिकाणावरूनही मतभेद दिसून आले. हा मेळावा मुंबईत घ्यायचा की पुण्यात, यावर नेत्यांमध्ये वेगवेगळी मतं पुढे आली.

याशिवाय सुनेत्रा पवार यांनी पक्षाची प्रतिमा खराब करणाऱ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली. काही आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे वारंवार मागणी करूनही अर्थ खाते मिळालं नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शेवटी, पक्ष एकसंघ असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या आणि अंतर्गत वादांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी नेत्यांना दिल्या.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts