• Home
  • गुन्हा
  • फोन उचलला नाही म्हणून नातू घरी गेला; आत आजी-आजोबांचे मृतदेह पाहून हादरला, खालापूर धक्कादायक प्रकार उघडीस
गुन्हा

फोन उचलला नाही म्हणून नातू घरी गेला; आत आजी-आजोबांचे मृतदेह पाहून हादरला, खालापूर धक्कादायक प्रकार उघडीस

Khalapur Double Murde

Khalapur Double Murde: खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसर हादरून गेला आहे..

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. घरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने गाव हादरून गेलं.

हेही वाचा: राष्ट्रवादीत अंतर्गतची चर्चा वाढल्या; प्रफुल पटेल बैठकीस गैरहजर; नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, ७५ वर्षीय रघुनाथ फराट आणि त्यांची ७२ वर्षीय पत्नी सुरेख फराट यांची अज्ञातांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा दोघेही फोन उचलत नसल्याने त्यांचा नातू निगडोली येथील घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याला आजी- आजोबा मृत अवस्थेत आठवले. या दृश्यामुळे त्याला मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केला आहे. अज्ञात आरोपींविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हत्या का करण्यात आली आणि आरोपी कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts