Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • CM विजय आणि PM मोदी समोरासमोर; भेटीने राजकारणात खळबळ, 25 मिनिटांत काय ठरलं?
Top News

CM विजय आणि PM मोदी समोरासमोर; भेटीने राजकारणात खळबळ, 25 मिनिटांत काय ठरलं?

CM Vijay Meets PM Modi in Delhi: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थळपती विजय यांनी काल २७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ही त्यांची मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची पहिलीच अधिकृत भेट ठरली असून, या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. नेमकं २५ मिनिटांत काय काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दिल्ली दौऱ्यावर पोहोचताच विजय यांनी प्रथम तामिळनाडू हाऊसमध्ये मुक्काम केला आणि त्यानंतर नियोजित वेळेनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटीसाठी रवाना झाले. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा; केंद्र सरकारकडून सकारात्मक संकेत

मोदींना फुलांचा गुच्छ देत नम्र अभिवादन केले

या भेटीवेळी विजय यांनी साध्या पण आकर्षक पोशाखात उपस्थिती लावली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींना फुलांचा गुच्छ देत नम्र अभिवादन केले. पंतप्रधानांनीही नेहमीप्रमाणेच हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. दोघांमधील संवाद अतिशय सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट होते.

बैठकीत कोणती चर्चा झाली?

या बैठकीत तामिळनाडूच्या विकासाशी संबंधित अनेक प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प, औद्योगिक गुंतवणूक, तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात केंद्र सरकारकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती विजय यांनी केली असल्याचे समजते.

संरक्षण क्षेत्रातील काही प्रकल्प तामिळनाडूत आणण्याबाबतही त्यांनी केंद्र सरकारसमोर प्रस्ताव मांडला. तसेच कावेरी नदीच्या पाणीवाटपाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणीही करण्यात आली.

विजयांनी चिंता व्यक्त केली

याशिवाय, श्रीलंकेकडून तामिळनाडूतील मच्छिमारांवर होणाऱ्या कारवायांबाबत विजय यांनी चिंता व्यक्त केली. अटकेत असलेल्या मच्छिमारांची सुटका आणि जप्त केलेल्या बोटी परत मिळवून देण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या भेटीचा राजकीय परिणाम काय होणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सध्या राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः काही पक्षांतील आमदारांच्या संभाव्य हालचालींमुळे ही भेट आणखी चर्चेत आली आहे.

एकूणच, मुख्यमंत्री विजय आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट केवळ औपचारिक न राहता, भविष्यातील राजकीय आणि विकासात्मक निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Comment (1)

  • मे 28, 2026

    अशोक खरात प्रकरणावर चित्रपटाच्या घोषणेनंतर धमकीचे फोन? दीपाली सय्यदांचा खळबळजनक दावा

    […] CM विजय आणि PM मोदी […]

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts