Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • गुप्त क्लिनिक, पोर्टेबल मशीन अन् मोठे व्यवहार; दौंडमधील रॅकेटचा पर्दाफाश
गुन्हा

गुप्त क्लिनिक, पोर्टेबल मशीन अन् मोठे व्यवहार; दौंडमधील रॅकेटचा पर्दाफाश

Daund
52

Secret Clinic Racket Exposed in Daund: दौंड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्येच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, आणखी काही डॉक्टर आणि मध्यस्थांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, गेल्या दोन मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.

हेही वाचा: शिवसेना एकत्रीकरणावर ब्रेक? राऊत म्हणाले – आधी मातोश्री, मगच पुढे!

गुप्तपणे चालत होती तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव परिसरातील एका ठिकाणी गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात होती. यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर केल्याचेही समोर आले आहे. ही तपासणी पूर्णपणे बेकायदेशी असून कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.

मोठी रक्कम आकारली जात होती

या बेकायदेशीर कामासाठी संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात होते. प्रत्येक प्रकरणासाठी हजारो रुपयांचा व्यवहार होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दोन जण पोलिसांच्या अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts