SSC JSA and LDC Recruitment 2026: कर्मचारी निवड आरोग (SSC) ने ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) आणि लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार २६ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
SSC ने JSA आणि LDC पदांसाठी अधिकृत अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरतीद्वारे विविध विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया ५ जून २६ पासून सुरू झाली असून उमेदवार २६ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
हेही वाचा: पुण्यात खळबळ! मित्रानेच केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
SSC ने भरतीची आधीसूचना जारी केली
SSC ने JSA आणि LDC पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांवर नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार निर्धारित कालावधीत अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
वयोमर्यादा आणि सवलत
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती (sc) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षाची सवलत मिळेल, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
परीक्षा पद्धत
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाईल
पेपर १
या पेपरमध्ये उमेदवारांना निबंध लेखन करावे लागेल. परीक्षा १०० गुणांची असेल आणि त्यासाठी १ तास ३० मिनिटांचा कालावधी दिली जाईल.
पेपर २
या पेपरमध्ये इंग्रजी, हिंदी आणि सामान्य ज्ञान (General Knowledge) यांवरील १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. हा पेपरही १०० गुणांचा असेल आणि त्यासाठी २ तासांचा कालावधी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी 0.25 गुणांची नकारात्मक गुणांकन (Negative Marking) लागू असेल.
अर्ज कसा करावा?
SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वन-टाइम- रजिस्ट्रेशन (One Time Registration) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करून अर्ज सादर करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट सुरक्षित ठेवण्यास विसरू नका.








