Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • फक्त अर्धा चमचा बडीशेप ठरू शकतो आरोग्याचा गेमचेंजर; जाणून घ्या त्याचे फायदे
लाईफस्टाईल

फक्त अर्धा चमचा बडीशेप ठरू शकतो आरोग्याचा गेमचेंजर; जाणून घ्या त्याचे फायदे

Fennel Seeds Benefits

Fennel Seeds Benefits: बडीशेप हा आपल्या रोजच्या वापरातील साधा मसाला असला तरी त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत. फक्त अर्धा चमचा बडीशेप नियमित घेतल्यास पचन सुधारण्यापासून ते शरीराला थंडावा देण्यापर्यंत अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या या छोट्याशा घटकाचे मोठे फायदे.

बडीशेप (Fennel Seeds) हा आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणार मसाला असला तरी त्याचे आरोग्यासाठीच फायदे अनेकांना माहित नसतात. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बडीशेप अत्यंत उपयुक्त ठरते. कमी प्रमाणात नियमित सेवन केल्यास पचनापासून ते तोंडाच्या आरोग्यापर्यंत अनेक समस्या दूर करण्यात मदत होते.

हेही वाचा : आजपासून शुक्र ग्रहाचा कर्क राशीत प्रवेश; मेष ते मीन राशींसाठी काय बदल होणार? जाणून घ्या

बडीशेपमध्ये विविध पोषक घटक आढळतात. यात फायबर, प्रथिने तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. याशिवाय व्हिटॅमिन ए, सी आणि ई ( Vitamin A, C & E) देखील मिळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

पोटाच्या तक्रारींवर प्रभावी उपाय

जेवणानंतर अनेकांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवते. अशावेळी थोडी बडीशेप चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त

बडीशेपमध्ये नैसर्गिकरीत्या ताजेपणा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ती माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. नियमित सेवन केल्यास तोंडांची दुर्गंधी कमी होते आणि तोंड स्वच्छ राहते.

मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास मदत

महिलांना पाळीदरम्यन होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी बडीशेप उपयोगी ठरू शकते. बडीशेप उकळून तयार केलेले कोमट पाणी पिल्यास शरीर रिलॅक्स होते आणि वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

शरीराला थंडावा देण्यासाठी उपयोगी

उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्यामुळे थकवा, जळजळ किंवा डिहायड्रेशन जाणवू शकते. अशावेळी बडीशेपचा चहा किंवा सरबत घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने वाटते.

कसे सेवन करावे?

जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खा.

बडीशेप पाण्यात उकळून त्याचे कोमट पाणी प्या

बडीशेपचा चहा किंवा सरबत बनवून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts