Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ममता बॅनर्जी दिल्ली बैठकीला, इकडे TMC चे १४ खासदार भाजपच्या गळाला?
Top News

ममता बॅनर्जी दिल्ली बैठकीला, इकडे TMC चे १४ खासदार भाजपच्या गळाला?

14 TMC MPs Joining BJP

14 TMC MPs Joining BJP : पश्चिम बंगालची सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जीसाठी आता काळ कठीण बनला आहे. अधिच वय साथ देत नाही, त्यात एकामागून एक पक्षाला हादरे बसत आहेत. मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीतल कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडं दिल्लीतच त्यांचे १४ खासदार मात्र गायब झाले आहेत, अशी चर्चा आहे. या खासदारांनी एकत्र येत एक बैठकही घेतल्याची माहिती समोर येत आहे.

१४ खासदारांनी CM सुवेंदू अधिकारी यांची घेतली भेट

तर दुसरीकडं तृणमूलच्या १४ खासदारांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची दिल्लीत भेट घेत बैठकही घेतली आहे. ही बैठक भाजपचे नेते भुपेंद्र यादव यांच्या घरी पार पडली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आजच दिल्लीत पोहोचले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत संपन्न झालेल्या या बैठीकीत तृणमूलचे १४ खासदार उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीचे फोटोही समोर आले आहेत. या बैठकीत भाजपचे नेते आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव हे देखील उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसून येत आहे.

सुखेंदू शेखर रॉय यांचा तडकाफडकी राजीनामा

तृणमूलचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदारकीची राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तृणमूलचे ५ खासदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामध्ये बर्दमान पूर्व च्या खासदार शर्मिला सरकार, हावडाचे खासदार प्रसून बॅनर्जी, कूचबिहारचे खासदार जगदीश बसुनिया, झारग्रामचे खासदार कालिपद सोरेन आणि बांकुराचे खासदार अरुप चक्रवर्ती यांचा समावेश आहे. सुखेंदू शेखर रॉय हे तृणमूलमध्ये गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून आहेत. ते तृणमूलमधील सर्वात वयस्कर खासदार म्हणून ओळखले जात होते. हे सर्व पाच खासदार देखील भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts