Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • सूरज चव्हाणच्या कुटुंबात गुडन्यूज! संजनाचा डोहाळजेवण व्हिडिओ व्हायरल
ताज्या बातम्या

सूरज चव्हाणच्या कुटुंबात गुडन्यूज! संजनाचा डोहाळजेवण व्हिडिओ व्हायरल

Suraj Chavan Good News

Suraj Chavan Good News: बिग बॉस मराठी च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी समोर अली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने शेअर केलेल्या व्हिडिओमधून संजना गरोदर असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता संजनाचा डोहाळजेवण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेत मोठा झटका! हजारो महिलांचा लाभ धोक्यात…

डोहाळजेवणाचा सोहळा ठरला खास

सूरज आणि संजनाच्या कुटूंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. होणाऱ्या बाळाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खास डोहाळजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संजना पारंपरिक लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. हिरव्या रंगाची साडी हातावरील मेहंदी आणि फुलांच्या दागिन्यांनी तिचा लूक अधिक आकर्षक बनवला होता.

जान्हवी किल्लेकरची खास उपस्थिती

या खास सोहळ्यात जान्हवी किल्लेकरनेही हजेरी लावली होती. तिने संजनाची ओटी भरतानाचे आणि कार्यक्रमातील अनेक क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “मी आत्या होणार आहे.” असे म्हणत तिने सूरज आणि संजनासोबतचे खास फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

बिग बॉसपासून खास नातं

बिग बॉस मराठी च्या घरात सुरू झालेली सूरज आणि जान्हवीची मैत्री घराबाहेरही तितकीच घट्ट राहिल्याचं दिसत आहे. सुरजच्या लग्नापासून ते प्रत्येक महत्वाच्या क्षणी जान्हवी त्याच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे. चाहत्यांकडूनही त्यांच्या या नात्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

लग्नानंतर नवीन पर्व

सूरज चव्हाण आणि संजना यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामती येथे थाटामाटात विवाह केला होता. आता लवकरच त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचं आगमन होणार असून कुटूंबात आनंदाचं वातावरण आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts