Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बैठकीआधीच राजकीय स्फोट; राऊतांचा इशारा…”पक्ष तोडाल तर आम्ही तुम्हाला तोडू!”
राजकारण

बैठकीआधीच राजकीय स्फोट; राऊतांचा इशारा…”पक्ष तोडाल तर आम्ही तुम्हाला तोडू!”

Sanjay Raut statement
66

संजय राऊत: ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची महत्त्वपूर्ण बैठक आज सकाळी ११ वाजता दिल्लीत आयोजित करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका मांडली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

“लोकशाही म्हणजे थट्टा वाटतेय का?” असा सवाल उपस्थित करत राऊत संतापले. पक्ष फोडण्याच्या हालचालींवर बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू.” तसेच, “तुरुंगाची भीती दाखवू नका. गरज पडल्यास आम्ही लढा देऊन तुरुंगातही जाऊ,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: NEET RE Exam आधी टेलिग्राम बंद; व्हॉट्सअॅप मात्र कायम सुरू, कारण वाचून आश्चर्य वाटेल?

शरद पवार यांचाही फोन (Sharad Pawar also called) 

राऊत यांनी पुढे सांगितले की, या सर्व घडामोडींवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही फोन आला होता. त्यामुळे आगामी राजकीय रणनीतीबाबत हालचाली वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

बंडखोर खासदारांवर टीका (Criticism of rebel MPs)

बंडखोर खासदारांवर टीका करत राऊत म्हणाले, “बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही. जे कोणी फुलत आहेत, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर दिलं जाईल.” त्यांनी स्पष्ट केले की, पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

“बंडखोर खासदारांना सोडणार नाही,” असा इशारा देत राऊत यांनी पक्षाच्या एकजुटीवर भर दिला. या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या या बैठकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

महत्वाची बैठक

आज दिल्लीत ठाकरे सेनेच्या संसदीय दलाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीला नेमके किती खासदार उपस्थित राहतील, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पक्षातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार या देखील दिल्ली दौऱ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या या बैठकीत सहभागी होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. या बैठकीत पुढील राजकीय भूमिका आणि रणनीती निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts