Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हा चेहरा ओळखीचा आहे…’; सुषमा अंधारेंच्या पोस्टने निर्माण केले नवे वादळ, गिरीश महाजनांबाबत चर्चांना उधाण
राजकारण

हा चेहरा ओळखीचा आहे…’; सुषमा अंधारेंच्या पोस्टने निर्माण केले नवे वादळ, गिरीश महाजनांबाबत चर्चांना उधाण

Sushma Andhare Say Girish Mahajan

Sushma Andhare Say Girish Mahajan: भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन ज्यांना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं. जे कुठंही संकट आलं की पहिल्यांदा धावून जाताना दिसतात..मात्र आता संकटमोचक गिरीश महाजनच मोठ्या अडचणीत सापडले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी महाजनांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे काही फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत..अरे हा चेहरा तर ओळखीचा आहे.. बापरे… भयंकर आहे हे..असं कॅप्शन सुषमा अंधारेंनी दिलंय..त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे..पण प्रश्न असा निर्माण झालाय की हे फोटो खरंच ओऱिजनल आहे का? खासदार फुटल्यानतंर अचानक महाजनांचे फोटो समोर कसे आले? महाजनांचा गेम करण्याचा कुणी प्रयत्न करत आहे का? पाहूयात या व्हिडिओतून…

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर घडवून आणलं आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे..यातच सुषमा अंधारेंनी काही फोटो ट्वीट केले आहेत..महाजनासारखे दिसणाऱ्या एका व्यक्तीचे वेगवेगळे 3-4 फोटो दिसत आहे…यावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापल्याने आता मंत्री गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो मॉर्फ आहे, असं महाजनांनी म्हटलं आहे..आता महाजनांचे फोटो मॉर्फ आहे की नाही हे तर पोलीस तपासानंतरच कळेल, मात्र राज्यात आणि देशात कोणतेही फोटो व्हायरल झाले, ते फोटो खरे देखील असले तरी मॉर्फ असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मोबाईलच्या झगमगाटात हरवलेली खेळणी… आजच्या मुलांना आरसा दाखवणारा ‘टॉय स्टोरी 5’

राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळांचे काही फोटो

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते आक्षेपार्ह अवस्थेत पाहायला मिळाले.मात्र त्यांनी देखील हे फोटो मॉर्फ आहे, माझा काही संबंध नाही, असं म्हणत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि आतापर्यंत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही..आता महाजनांचे फोटो ओरिजनल आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय…पण अचानक महाजनांचे फोटो समोर कसे आले आसाही प्रश्न निर्माण होत आहे..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती..आता एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी राबवले आहे..ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले असून हे खासदार आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे..शिवसेनेत दोनदा बंडखोरी झाली..पहिल्यांदा 2022 मध्ये आणि आता दुसऱ्यांदा 2026 मध्ये..त्यामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे…ठाकरे गटाचे कार्यकर्ते राज्यभरात रस्त्यावर उतरताना दिसत आहे..तर नागरिकांमधून देखील संताप पाहायला मिळत आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना यातच महाजनांचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत..आता या फोटोंच्या समोर येण्याच्या वेळेवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे..कारण बंडखोर खासदारांवरील रोष कमी करण्यासाठी हे फोटो व्हायरल करण्यात आले तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे..महाजनांचे फोटो समोर आले तर बंडखोर खासदारांवरील सर्व लक्ष महाजनांकडे जाईल, असं कुणाला वाटतंय का? महाजनांचे व्हायरल होत असलेले कथित फोटो जवळच्या व्यक्तींनीच व्हायरल केलेत का असाही प्रश्न निर्माण झालाय..

Sushma Andhare , Girish Mahajan :

गिरीश महाजनांच्या फोटोवरुन वाद

फोटोवरुन वाद वाढत असताना आता यावर गिरीश महाजनांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय..त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत सदर फोटो मोर्फ केलेला आहे … यासंदर्भात मी उद्या मुंबई तक्रार देखील दाखल करणार आहे.. मला माहीत नाही हे फोटो कसे मोर्फ केले.. पण याबाबत निश्चितच मी तक्रार करतोय, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे..

गिरीश महाजनांनी उद्या मुंबईत तक्रार दाखल करणार

गिरीश महाजनांनी उद्या मुंबईत तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. पण प्रश्न असा निर्माण झालाय की ते या व्हायरल फोटोबाबत आज तक्रार का करणार नाही? जर त्यांचे काही मॉर्फ केलेले फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..तर ते आजच पोलिसांमध्ये जाऊन तक्रार का करत नाही..ते सायबर सेलकडे देखील तक्रार करु शकतात.महाजन उद्या तक्रार करणार असल्याने हे फोटो ओरिजनल तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे..जर महाजनांच्या वक्तव्यानुसार हे फोटो मॉर्फ केलेले आहेत..तर राज्यातील एका मंत्र्याचे असे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल होत असेल तर सर्वसामान्यांचे काय?

Sushma Andhare, Girish Mahajan :

महिला आणि मुलींचे देखील असे मॉर्फ केलेले फोटो

राज्यातील महिला आणि मुलींचे देखील असे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतील..मुलींचे फोटो मॉर्फ करुन ऑनलाईन विकले जात असतील…त्यामुळे पोलीस प्रशासनाने महाजनांचे फोटो ओरिजनल आहे की नाही, याचा तपास करुन तात्काळ सत्य काय आहे..सर्वांसमोर मांडावे..राज्यात असला प्रकार कोण करत आहे आणि कधीपासून सुरु आहे, हे देखील जनतेला सांगावे…नरहरी झिरवाळ यांचे देखील फोटो ओरिजनल होते की नाही, हे देखील जनतेसमोर आणावे…मॉर्फ फोटो बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जर महिलांसोबत मंत्र्यांचे ओरिजनल फोटो समोर येत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहे…

Youtube : youtube.com/channel/UC5tZ7UVY_IuOv88_eQSVMdg

Instagram : instagram.com/lsmarathi

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts