Lohagad Fort Ketan Agarwal Case:
Lohagad Fort Ketan Agarwal Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी केतन अग्रवाल आणि त्याची होणारी बायको गेले असताना फोटो काढताना केतन अग्रवाल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना 18 जून (गुरुवारी) घडली. या घटनेला आता नवे वळण मिळाले असून प्रकरणाबाबत संशय वाढत आहे. नेमकं काय घडलं, याबाबत पोलिस तपासात नवी माहिती समोर येत आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या २४ वर्षीय केतन अग्रवालचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनेने (Lohagad Fort Ketan Agarwal Case) मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समोर आले होते. मात्र पोलीस तपासात हा अपघात नसून तरुणाला ढकलून देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नी आणि तिच्या एका मित्रावर गंभीर आरोप समोर आले आहेत. चला तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी ट्रेक (Birthday Celebration)
मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अग्रावल हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) गेला होता. दोघेही ट्रेकिंगदरम्यान दरीच्या कडेला फोटो काढत असताना ही घटना घडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र नंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात या घटनेमागे अपघात नसून संशयास्पद परिस्थिती असल्याचे समोर येऊ लागले आहे.
अपघात नव्हे तर हत्या? (Murder, not an accident?)
पोलिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोटोसाठी पोज देताना केतनच्या पाय घसरला नसून त्याला जाणीवपूर्वक दरीत ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात होणारी पत्नी आणि तिच्या एका मित्राचा सहभाग असल्याचा आरोप असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील परिस्थिती यांचा अभ्यास सुरू केला आहे.
Lohagad Fort Ketan Agarwal Case: लग्नाची मोठी तयारी
मृत केतनचे लग्न नोव्हेंबर महिन्यात ठरले होते. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात तयारीही करण्यात आली होती, ज्यात परदेशी शैलीतील आयोजन आणि मोठा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.
Ketan Agarwal :
तपासात नवे दावे
प्राथमिक तपासात समोर आलेल्या काही माहितीनुसार, हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केतनला मुद्दाम लोहगड किल्ल्यावर नेऊन योग्य संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर केलेला नाही. (LS Marathi News Channel)












