Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मोठी बातमी! राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?
Top News

मोठी बातमी! राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

Ram Mandir Trust Ayodha
Ram Mandir Trust Ayodha: अयोध्या राम मंदिर ट्रस्टशी संबंधित मोठे घडामोड समोर आली आहे. ट्रस्टचे सदस्य चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामागचे नेमकं कारण काय आहे, याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अयोध्या येथी राम मंदिरातील देणगीसंदर्भातील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाला नवे वळण मिळाल्याची माहिती समोर येत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदांचा राजीनामा दिल्याचे माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

हेही वाचा: येत्या २८ जूनला ‘टीईटी’! वेळेआधी २५ मिनिटे उपस्थिती अनिवार्य; जाणून घ्या नवीन नियम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनतर विशेष तपास पथक (SIT) कडून सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ट्रस्टच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

पहिला एफआयआर दाखल

याआधी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणात पहिला एफआयआर दाखल केला आहे. यात ८ जणांची नावे नमूद करण्यात आली असून, इतर काही अज्ञात व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सध्या एसआयटी कथित आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, मालमत्ता, मोबाईल रेकॉर्ड तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहे. प्राथमिक अहवालातील शिफारशींनंतर तपासाला अधिक गती मिळाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याचा संबंध सुरू असलेल्या चौकशीशी जोडला जात असून, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, चौकशीत कोणत्याही स्तरावर अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे देशभरातील रामभक्त आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, एसआयटीच्या अंतिम अहवालानंतर या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts