Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • कडू लागणारी स्मूदी, डिलीट केलेले चॅट्स आणि प्रेयसीला केलेले कॉल; अमेरिकन पोलिसांनी पत्नीच्या हत्येचा उलगडा कसा केला?
गुन्हा

कडू लागणारी स्मूदी, डिलीट केलेले चॅट्स आणि प्रेयसीला केलेले कॉल; अमेरिकन पोलिसांनी पत्नीच्या हत्येचा उलगडा कसा केला?

Hydrabad Crime

Hydrabad Crime: अमेरिकेतील वॉशिंग्टन (America Washington) राज्यातील बेलव्ह्यू शहरात भारतीय वंशांच्या विवाहित महिलेला मृत्यूच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या घटनेत आता पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला असून, अमेरिकन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या दाम्पत्याच्या विवाहाला अवघे चार महिने झाले होते.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तेलंगणातील सॉफ्टवेअर अभियंता अविनाश नार्ने (Avinash Narne) याला पत्नी राजिता सब्बिनेनी (Rajita Sabbineni) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अटक करण्यात आली. घटनेनंतर अविनाशने आपत्कालीन सेवांना फोन करून पत्नी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती दिली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, तो बाहेरून परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने मदतीसाठी संपर्क साधण्यात आला.

घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन पथकाने बाथरूमचा दरवाजा उघडून राजिता यांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. सीपीआर देण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा: ‘आज माझा तरी शेवट नाहीतर पुढच्याचा…’; स्टेटस ठेऊन पत्नीची भररस्त्यात हत्या; नेमकं काय घडलं?

शवविच्छेदनाने उघड केलं धक्कादायक सत्य

या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने वळला तो शवविच्छेदन अहवालानंतर. अहवालात राजिता यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे श्वास रोखला गेल्याने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद मृत्यूऐवजी हत्येचा गुन्हा मानून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना अविनाशचा भारतातील एका महिलेशी सातत्याने संपर्क असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजिता यांच्या मृत्यूच्या दिवशी त्याने त्या महिलेशी अनेक वेळा फोनवर संवाद साधला होता. तसेच राजिता यांच्या मृतदेहाचा फोटोही तिला पाठवल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.

डिजिटल पुरावे ठरले निर्णायक

या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे राजिता यांनी पतीने तयार केलेल्या स्मूदीबाबत पाठवलेला संदेश. त्या संदेशात स्मूदीची चव कफ सिरपसारखी कडू लागत असल्याचा उल्लेख होता. पोलिसांनी या संदेशासह मोबाईलमधील डिजिटल माहिती, कॉल रेकॉर्ड आणि हटवण्यात आलेले चॅट्स यांची सखोल तपासणी केली. या सर्व पुराव्यांच्या आधारे अविनाशवर संशय अधिक बळावल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात नमूद केले.

मृतदेहाचा फोटो पाठवल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, लग्नानंतरही अविनाशचा संबंधित महिलेशी संपर्क सुरू होता. घटनेच्या दिवशी त्याने तिला अनेक वेळा फोन केल्याचे रेकॉर्ड समोर आले आहेत. याशिवाय, काही संभाषणे आणि संदेश जाणीवपूर्वक हटवण्यात आल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चौकशीदरम्यान मृतदेहाचा फोटो पाठवल्याची बाब त्याने मान्य केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील तेलुगू समाजातील स्वयंसेवकांनी सांगितले की, राजिता यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेसाठी अविनाश आणि त्याचा मित्र त्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला हा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू असल्याचेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या तयारीतही त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, पोलिस तपासातून हत्येचा संशय व्यक्त झाल्यानंतर समुदायालाही मोठा धक्का बसला.

घटनेचा दिवस

स्वयंसेवकांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी राजिता अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी सकाळी कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर औषधे आणि अन्नपदार्थ आणण्यासाठी अविनाश बाहेर गेला होता. परत आल्यानंतर पत्नी बाथरूममध्ये प्रतिसाद देत नसल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, त्यानंतरच्या तपासात अनेक विसंगती समोर आल्याने प्रकरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले.

सध्या अविनाश नार्ने याच्याविरोधातील गुन्ह्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, तपास यंत्रणा डिजिटल पुरावे आणि इतर साक्षींच्या आधारे पुढील चौकशी करत आहेत. या प्रकरणात आगामी सुनावण्यांमध्ये आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts