Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार
महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार

Deccan Queen
Deccan Queen: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे–मुंबई रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. त्यामुळे आज १६ जुलैपासून डेक्कन क्वीन आणि पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

कर्जत- लोणावळा घाट विभागातील दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबईत रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. त्यामूळे आजपासून डेक्कन क्वीन (Deccan Queen) आणि पुणे- मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस (Pune Mumbai Intercity) या दोन्ही महत्वाच्या गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार असून, हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे–मुंबई रेल्वे सेवा आता पूर्ववत

कर्जत–लोणावळा (Karjat Lonavala) घाट विभागात दरड कोसळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली पुणे–मुंबई रेल्वे सेवा (Pune Mumbai Train Service) आता पूर्ववत होत आहे. रेल्वे प्रशासनाने आजपासून डेक्कन क्वीन आणि पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज 48 हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ होणार फडणवीसांची घोषणा

अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या

मुसळधार पावसामुळे कर्जत–लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते.

१,२०० कर्मचारी घेऊन मेहनत घेऊन दरड हटविणे

रेल्वे प्रशासनाने गेल्या दहा दिवसांपासून युद्धपातळीवर बचाव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे १,२०० कर्मचारी, अभियंते आणि तांत्रिक पथकांनी अखंड मेहनत घेऊन दरड हटविणे, रेल्वे रुळांची तपासणी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण केली. तसेच आणखी एक रेल्वे मार्गही वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा

या कामांनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत होत असून, आजपासून डेक्कन क्वीन आणि पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस नियमितपणे धावणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळातही हवामानाचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts