ISRO Scientists Resignation : अमेरिका-चीन-इस्त्रायल तंत्रज्ञानामुळे झपाट्याने पुढे जात आहे…इराणसारखा देश सुद्धा तंत्रज्ञानामुळे अमेरिका आणि इस्त्रायला घाम फोडत आहे…चीनमध्ये तर लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं जातं…तर भारतात या उलट घडताना दिसतंय..12 वी पर्यंत विद्यार्थ्यांना असं शिक्षण दिलं जातं, ज्याचं वैयक्तिक आयुष्यात जास्त काही फायदाच होत नाही…जे थोडे फार विद्यार्थी तंत्रज्ञानाची आवड घेऊन शिक्षण घेतात त्यांना नासा सारख्या कंपन्या बोलावून घेतात..ज्यांच्या मनात देशासाठी काम करण्याची इच्छा असते ते इस्त्रोमध्ये जातात..मात्र याच इस्त्रोतील 100 ते 120 शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी आता राजीनामे दिले आहेत..गगनयान’सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे..या व्हिडिओतून पाहूयात की 100 ते 120 जणांनी अचानक राजीनामे का दिले आहेत? इस्त्रोमध्ये नेमकं काय घडतंय? केंद्र सरकार नेमकं काय करतंय?
ISRO मधून 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे का दिले?
भारतात IITमधून शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण नासामध्ये नोकरी करण्यासाठी निघून जातात…त्यांना त्या ठिकाणी चांगला पगार दिला जातो…मात्र आपल्या देशावर प्रेम असणारे अनेक जण इस्त्रोमध्ये जाऊन काम करतात…एकदम कमी पैशात इस्त्रोने अनेक प्रकल्प यशस्वी करून दाखवले आहेत..चंद्रयान मोहिमची तर जगभरात चर्चा होते…ज्या ठिकाणी आतापर्यंत कोणताही देश उतरू शकला नाही, तिथं भारताचा चंद्रयान 3 उतरला…चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची दाट शक्यता आहे.. चंद्रयान-3 ने तेथील माती, तापमान आणि खनिजांचा अभ्यास करून मानवाच्या भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा केली आहे…
यानंतर आता इस्त्रो गगनयान मोहिम राबवण्याच्या तयारीत आहे…मात्र गगनयानसह अन्य मोहिमांवर काम करणाऱ्या 100-120 इस्रो शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले आहेत.. ज्यामुळे भविष्यातील प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती आहे… यू. आर. राव उपग्रह केंद्रातून 80, तर तिरुवअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातून किमान 20 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते…व्हिक्टर जोसेफ- विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील एलव्हीएम-3 प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक…अशा ज्येष्ठांची देखील नाव यात आहेत… त्यांनी असा निर्णय का घेतला यामागची कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत…मात्र हे राजीनामे रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि इस्त्रोने नियम कठोर केल्याची माहिती आहे.. दिल्लीच्या मंजुरीशिवाय राजीनामा स्वीकारला जाणार नाही..संबंधित मोहिमा पूर्ण होईपर्यंत राजीनाम्याची मंजुरी प्रलंबित ठेवण्याच्या सूचना इस्रोने विविध केंद्र संचालकांना दिल्या आहेत. राजीनाम्याचे प्रलंबित किंवा नवीन बाहेर पडण्याचे अर्ज संबंधित केंद्र संचालकांच्या औपचारिक शिफारशीसह अंतिम मंजुरीसाठी थेट दिल्लीतील अंतराळ विभागाकडे पाठवावे लागणार आहेत…
हेही वाचा : अमित ठाकरे दिल्लीत जाणार! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.
गगनयान, चांद्रयान-4 आणि मंगळयान-2 मोहिमांवर काय परिणाम होणार?
या शास्त्रज्ञांनी जर कामावर येण्यास नकार दिला तर भारताला मोठा फटका बसणार आहे…कारण गगनयान व्यतिरिक्त, चांद्रयान-4, भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस) आणि मंगळयान-2 यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत..या प्रकल्पातील शास्त्रज्ञच जर राजीनामा देत असेल तर प्रकल्प पुढे कसं जाणार असा प्रश्न निर्माण झालाय…जर इस्त्रो किंवा केंद्र सरकार या शास्त्रज्ञांना जबरदस्तीने कामावर बोलावलं तर ते खरंच मन लावून काम करतील का? आणि यात ते खरंच योगदान देतील का? असाही प्रश्न निर्माण झालाय..
ISRO Scientists Resignation : खाजगी अवकाश स्टार्टअप्सचे वाढते आकर्षण यामुळे शास्त्रज्ञ राजीनामा देत आहे, असं म्हटलं जात आहे..2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले झाल्यापासून देशात 400 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स उदयास आले आहेत..या ठिकाणी शास्त्रज्ञांना चांगल्या सुविधा आणि चांगला पगार दिला जातो..त्यामुळे शास्त्रज्ञ त्यांच्याकडे वळत असल्याची चर्चा आहे..तसंच केवळ पैसाच नाही, तर खाजगी कंपन्यांमध्ये शास्त्रज्ञांना मिळणारे कामाचे स्वातंत्र्य आणि वेगाने निर्णय घेण्याची पद्धत देखील त्यांना आकर्षित करत आहे… सरकारी यंत्रणेतील संथ प्रगती आणि फिक्स वेतनश्रेणी यामुळे अनेक शास्त्रज्ञ स्वतःची खरी किंमत ओळखत खाजगी क्षेत्राकडे वळत आहेत, असं म्हटलं जात आहे..
कमी पगारामुळे ISRO मधील शास्त्रज्ञ खासगी कंपन्यांकडे वळत आहेत का?
जर असं असेल तर सरकार इस्त्रोतील शस्त्रज्ञांना चांगला पगार का देत नाही? असा प्रश्न निर्माण झालाय…इस्त्रोमधील नवीन शास्त्रज्ञांना सुरुवातीला मूळ पगार 56, 100 रुपये प्रति महिना असतो..तर सर्व भत्ते मिळवून पगार 90 हजार रुपयांच्या आसपास असतो…तर इस्त्रोच्या अध्यक्षांचा पगार महिन्याला जवळपास अडीच लाख रुपयांच्या आसपास असतो, अशी माहिती आहे…तर खासगी कंपन्या या शास्त्रज्ञांना या पगारापेक्षा 3 ते 5 पट अधिक पगार वाढवून देतात, अशी माहिती आहे…काही महिन्यांपूर्वी स्वतः इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली होती…”जेव्हा आम्ही आयआयटी दिल्लीमध्ये भरतीसाठी गेलो, तेव्हा तिथल्या 60% विद्यार्थ्यांनी फक्त इस्रोचा पगार पाहून तिथून पळ काढला, असं ते म्हणाले.. हुशार विद्यार्थ्यांना अंतराळ मोहिमेची आवड असते, पण कौटुंबिक गरजा आणि कर्जांमुळे ते कमी पगाराची सरकारी नोकरी स्वीकारू शकत नाहीत, असंही म्हटलं…
ISRO विरुद्ध NASA: पगार आणि सुविधांमध्ये किती मोठा फरक आहे?
जर इस्त्रो आणि नासा यांच्यातील शास्त्रज्ञांच्या पगाराची तुलना करायची म्हटलं तर यांच्यात मोठा फरक आहे…नासामधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा किंवा शास्त्रज्ञाचा सरासरी वार्षिक पगार 3 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो…याउलट, इस्रो प्रमुखांचा सर्वोच्च वार्षिक पगार साधारण 25 ते 30 लाख रुपये असतो, अशी माहिती आहे.. म्हणजेच नासामधील पगार इस्रोच्या तुलनेत जवळपास 800% पेक्षा जास्त आहे…त्यामुळे आज अमेरिका एवढ्या झपाट्याने समोर जात आहे..
चीन देखील तंत्रज्ञानावर करोडो रुपये खर्च करत आहे…चीन आज सिक्स जनरेशन फायटर जेटवर काम करत आहे..त्या ठिकाणी भारत शास्त्रज्ञांच्या पगारावर अडकून पडलेला आहे…जग तंत्रज्ञानाने बदलत आहेत..सर्व काम AI आणि प्रगत तंत्रज्ञानाने केली जात आहे…त्या ठिकाणी भारत संशोधनात आणि पगारात कमी पडत आहे..आज भारत तंत्रज्ञानावर आणि संशोधनावर अतिशय कमी पैसे खर्च करताना दिसत आहे..जर भारताला तंत्रज्ञानात खरंच जगाच्या पुढे जायचं असेल तर शास्त्रज्ञांचा पगार वाढवत संशोधनात जास्त पैसे गुंतवावे लागेल…









