Top India News Today: देशभरातील राजकारण, अर्थव्यवस्था, क्रीडा, तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील आजच्या सर्व मोठ्या घडामोडी आम्ही एका ठिकाणी घेऊन आलो आहोत.
देशभरात आज दिवसभर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांतील मोठ्या घटनांनी दिवसभर चर्चेचा विषय ठरल्या. या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा आम्ही तुमच्यासाठी एका ठिकाणी घेऊन आलो आहोत. दिवसातील कोणतीही मोठी घडामोड चुकू नये, यासाठी वाचा आजच्या टॉप बातम्या आणि जाणून घ्या देशभरात नेमकं काय घडलं.
Live: वांगचुकांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं आंदोलन
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Live: खरातच्या भोवती ईडीचा फास अधिक घट्ट
ईडीने भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांची १९ कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वीच्या कारवाईसह या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता जप्त अथवा गोठविण्यात आली आहे.
Live: स्कायरूटच्या विक्रम-१ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-१ या स्वदेशी खासगी ऑर्बिटल रॉकेटचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे सांगितले जात असून, विविध पेलोड यशस्वीरीत्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Live: पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास; जपान ओपन किताब पटकावला
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. जपान ओपन जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली असून अंतिम सामन्यात तिने सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला
Live: महाराष्ट्रभर उद्या IMA कडून OPD सेवा बंद
डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) २० जुलै रोजी राज्यभर नियमित OPD सेवा २४ तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे









