Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • BTech विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! Indian Army मध्ये 136 पदांसाठी भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
शैक्षणिक बातम्या

BTech विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! Indian Army मध्ये 136 पदांसाठी भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Indian Army SSC Tech Recruitment 2026
Indian Army SSC Tech Recruitment 2026: BTech पदवीधर आणि अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Army ने SSC (Tech) अंतर्गत १३६ अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांना निश्चित मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

अभियांत्रिकी (BTech) पदवीधर आणि अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन आर्मीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC Tech) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

भारतीय सैन्याच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग अंतर्गत SSC (Tech) भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीत ६८ पुरुष आणि ६८ महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

हेही वाचा:  चातुर्मासाला उद्यापासून सुरुवात; आता भगवान विष्णू ४ महिने योगनिद्रेत जाणार; जाणून घ्या धार्मिक महत्व

पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम

पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट, तर महिला उमेदवारांसाठी 7 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

कोण करू शकतो अर्ज?

या भरतीसाठी BTech किंवा अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेले उमेदवार, तसेच अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्षांदरम्यान असावे. वयोमर्यादेची गणना 1 एप्रिल 2027 या तारखेच्या आधारे केली जाईल. तसेच अविवाहित (Unmarried) उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

फक्त अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांतील (Engineering Streams) उमेदवारांनाच अर्ज करता येईल.

अर्ज कसा कराल?

पात्र उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक माहिती आणि इतर तपशील अचूकपणे भरावेत.

SSC (Tech) अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts