Karnataka HIV Cases : कर्नाट्कमधून एचआयव्ही संसर्गाबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील सुमारे ७ हजारहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने सुरू केल्या आहेत.
एचआयव्ही आणि एड्सबाबत देशभरात सातत्याने जनजागृती केली जाते. योग्य काळजी, तपासणी आणि वेळेवर उपचार यामुळे एचआयव्हीचा सामना करणे शक्य आहे. मात्र, संसर्ग रोखण्यासाठी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे मानले जातात.
हेही वाचा: ‘आता शेवटचा लढा’; मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
कर्नाटकमधील समोर आलेल्या आकडेवारीनंतर आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये एचआयव्ही तपासणी आणि समुपदेशनावर भर दिला जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी तपासणी आणि समुपदेशन मोहीम
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या (KSAPS) सूचनेनुसार राज्यातील महाविद्यालयांमध्ये विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत सरकारी, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी तसेच समुपदेशन शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
कर्नाटकातील एचआयव्हीची स्थिती
समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एकूण लोकसंख्येपैकी मोठ्या संख्येने नागरिक एचआयव्ही संसर्गासह जीवन जगत आहेत. त्यापैकी अनेक जण उपचार घेत असून, काही लोकांना अद्याप आपल्या संसर्गाबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय, तपासणी आणि आरोग्य शिक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
आकडेवारीने वाढवली चिंता
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत एचआयव्ही संसर्गाच्या नोंदींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः १८ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाची संख्या समोर आल्याने प्रशासनाने महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीबाबत भीती न बाळगता योग्य माहिती, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
टीप: एचआयव्हीबाबत कोणत्याही शंकेसाठी अधिकृत आरोग्य केंद्र किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.



