Rahul Gandhi Andhbhakt Remark : कॉक्रोच जनता पार्टीच्या आणि gen z आंदोलनांनी सरकारला गुढघे टेकवायला भाग पाडलं, त्यानंतर संसदेत परीक्षा विधेयकावर चर्चां सुरु झाली असतांना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंधभक्तांना जे म्हटलं त्याने संसदेत गदारोळ झाला, भाजपवाले जोरदार तापले…. असं काय बोलले राहुल गांधी संसदेत ज्यावरून एवढा राडा झाला?
‘अंधभक्त’ म्हणत राहुल गांधींचा भाजपवर निशाणा; संसदेत मोठा गदारोळ : ( Rahul Gandhi Andhbhakt Remark )
आज संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिल्लीच्या दरबारात भाजपच्या कट्टर समर्थकांवर असा काही हल्लाबोल केला कि सत्ताधाऱ्यांची पार झोपच उडवली… विषय चालला होता पोरांच्या पेपरफुटीचा आणि भविष्याचा. राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या एका तरुणीचा किस्सा ऐकवला. त्या पोरीने देशातल्या लोकांचे तीन प्रकार सांगितले होते, जे राहुल गांधींनी संसदेत जसेच्या तसे सांगितले. राहुल गांधींनी एका आंदोलक विद्यार्थिनीशी संवाद साधला होता तर ती मुलगी राहुल गांधींना म्हटली होती की, या देशात तीन टाईपची लोकं असतात
१. विद्यार्थी – जे कायम खरं काय ते शोधतात आणि शिकायला तयार असतात.
२ मूर्ख – ज्यांना वाटतं की आपल्यालाच सगळं समजतंय, जे कोणाचंच ऐकत नाहीत आणि स्वतःची एक खोटी Image करून फिरतात.
आणि ३. अंधभक्त- अंधभक्त म्हणजे असा माणूस, जो म्हणतो माझंच खर बाकी सगळ्यांना काहीच काळात नाही मलाच कळत… राहुल गांधींनी म्हटलं कि अंधभक्त हे मूर्खांना देव मानतात….
हेही वाचा : पुण्यात 1 कोटींच्या दरोड्याचा कट? CCTV मुळे पोलिसांचं कांड उघड
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया : ( Rahul Gandhi Andhbhakt Remark )
जसा हा अंधभक्त शब्द राहुल गांधींच्या तोंडातून निघाला, तसा सत्ताधारी बाकावरचे मंत्री आणि खासदार यांनी गदारोळ सुरु केला…
हे अंधभक्त प्रकरण नक्की असतंय काय? अनेकांच्या मते सांगायचं तर, अंधभक्त म्हणजे असा माणूस ज्याचा मेंदू गहाण ठेवलेला असतो.. सामान्य माणूस कसा असतो? नेत्याने चांगलं काम केलं तर टाळ्या वाजवतो आणि काही चुकलं तर हिशोब मागतो. पण अंधभक्ताचं तसं नसतं. नेत्याने जर दुपारी बारा वाजता सांगितलं की बघा बाहेर किती भारी चांदण्या पडल्यात, तर हा अंधभक्त डोळे चोळत बाहेर येईल आणि म्हणेल, हो मालक, काय चमकतायत चांदण्या.. म्हणजे स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही. माणसाला माणूस समजून वागवणं सोडून हे लोक आपल्या नेत्याला देवाच्या गाभाऱ्यात नेऊन बसवतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आधीच सांगून ठेवलं होतं की, राजकारणात अशी व्यक्तीपूजा किंवा अंधभक्ती आली की समजायचं हुकूमशाहीची पावलं पडायला लागलीत. अंधभक्ताला वाटतं त्याचा नेता त्रिकालज्ञानी आहे, तो कधी चुकूच शकत नाही. आता समजा, बाजारात महागाई वाढली, पोरांचे पेपर फुटले, नोकऱ्या गेल्या आणि हे सत्य तुम्ही अंधभक्ताच्या डोळ्यासमोर आणून ठेवलं, तरी तो ते मान्य करणार नाही. तो उलट तुम्हालाच म्हणणार, अरे, हे आपल्या नेत्याचं मोठं नियोजन आहे, तुला काय त्यातलं कळतंय? देश बदलतोय… म्हणजे वास्तवाची पार वाट लागली तरी हे आपल्याच धुंदीत जगणार. अंधभक्तीत फक्त नेत्यावर प्रेम नसतं, तर नेत्याला प्रश्न विचारणाऱ्याबद्दल मनात भयंकर राग असतो. जर देशातल्या एखाद्या नागरिकाने नेत्याला अडचण होईल असा प्रश्न विचारला, तर हे अंधभक्त त्याला देशद्रोही किंवा गद्दार ठरवून मोकळे होतात. चर्चा करणे, समजून घेणे यांच्या डिक्शनरीतच नसतं.
भाजपचा पलटवार आणि विरोधकांची प्रतिक्रिया
Rahul Gandhi Andhbhakt Remark : तत्कालीन कॉंग्रेस सरकारला २०१४ ला देशातील तरुणांनी प्रचंड विरोध करून भाजपला मोठं केलं, त्यानंतरच्या काही वर्षात तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड क्रेझ होती, मात्र गेल्या एक दोन वर्षांमध्ये वारं बदललय, GEN Z यांनी मोदींना डोक्यावर घेतलं होतं तेच आता भाजपच्या सिस्टीम विरोधात आवाज उठवत आहेत, मात्र यात अजूनही असे काही तरुण आहेत, कि ते भाजपच्या पूर्ण समर्थनार्थ आहेत, इतके कि, भाजपने काही चुकीचं जरी केलं तरी ते समर्थनार्थच बोलतील, आणि त्यांना लोकांनी अंधभक्त हे नाव दिलंय…
पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्मनंतर नंतर भारताच्या राजकारणात अंधभक्त हा शब्द विशेष प्रसिद्ध झाला. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर आणि अतिउत्साही समर्थकांना ट्रोल करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्सनी अंधभक्त या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला.सोशल मीडिया आणि टीव्हीवरील राजकीय चर्चांमुळे हा शब्द घराघरांत पोहोचला. कोणत्याही नेत्याचा तार्किक विचार न करता आंधळेपणाने पाठिंबा देणाऱ्या मानसिकतेला दर्शवण्यासाठी हा एक राजकीय स्लँग बनला आहे….
राहुल गांधींनी आज मांडलेला हा सगळा खेळ बघितला तर एक गोष्ट एकदम काचेसारखी साफ होते. कोणतीही लोकशाही किंवा देश तेव्हाच जिवंत राहतो आणि प्रगती करतो, जेव्हा देशातली जनता विद्यार्थी बनून राहते. म्हणजेच, जी डोळे उघडे ठेवून सरकारला प्रश्न विचारते आणि हिशोब मागते. पण ज्या दिवशी जनता विचार करणं सोडून देते, नेत्याच्या मागे आंधळी होऊन धावते आणि डोळ्यावर पट्टी बांधून वास्तवाकडे दुर्लक्ष करते, त्या दिवशी देशाचा कणा मोडतो. संसदेतल्या आजच्या या राड्याने देशातल्या प्रत्येक माणसाला एकच धडा दिलाय की प्रश्न विचारणारे विद्यार्थी बना, डोळे मिटून मागे फिरणारे अंधभक्त बनू नका…..









