Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • विद्यार्थी आंदोलनानंतर पंकजा मुंडेंचा मोदींसाठी भावनिक व्हिडिओ ; नेमकं काय म्हणाल्या?
ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनानंतर पंकजा मुंडेंचा मोदींसाठी भावनिक व्हिडिओ ; नेमकं काय म्हणाल्या?

Narendra Modi

Narendra Modi : जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी तरूणांवर अमानुष लाठीचार्ज केला..मुलींनाही पोलिसांनी मारहाण करत कपडे फाडल्याचा आरोप आहे…यावरून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे…भाजपपासून तरूण वर्ग दूर होईल, असं लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी रात्री तरूणांसाठी एक रिल बनवली..त्यानंतर पुन्हा पीएम मोदींनी तरूणांसाठी रिल्स बनवत तरूणांना माफ केल्याचे म्हटलं..त्यांच्या रिल्सवर देखील विरोधकांनी जोरदार टीका केली…पंतप्रधान मोदी तरुणांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न करत असताना विरोधक त्यांना धारेवर धरत आहेत..यातच आता मंत्री पकंजा मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक भावनिक व्हिडिओ बनवला आहे…त्यामुळे  पाहूयात की पंकजा मुंडेंनी व्हिडिओ बनवत काय म्हटलं आहे? भाजपचे नेते काही दिवसांपासून रिल्स, व्हिडिओ का बनवत आहेत?

पीएम मोदींचा तरुणांसाठी संदेश आणि सोशल मीडिया पोस्ट ( Narendra Modi )

तरूणांच्या आंदोलनाला चिरडण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला..तरूणावर अमानुष लाठीचार्जही करण्यात आला…तरीही तरूण डगमगले नाही…तरूण पुन्हा जंतरमंतरवर जमले आणि केंद्र सरकरला झुकावं लागलं..केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचं ठरवलं…आणि प्रधान यांनी राजीनामा देखील दिला..मात्र या आंदोलनात काही तरूणांनी पीएम नरेंद्र मोदींना ( Narendra Modi ) शिवीगाळ केली होती..त्यामुळे पोलीस या तरूणांवर एफआयआर दाखल करत कारवाई करत आहेत…मात्र पीएम मोदींनी रिल बनवत या तरूणांना मी माफ करतो, हे वयचं असं असतं, काही कळत नाही, असं म्हटलं..मोदींनी मोठेपणा दाखवत तरूणांना माफ केल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार कौतुक होत आहे..पण काही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत आहे…ही टीका होत असतानाच आता भाजप नेत्या आणि पंकजा मुंडेंनी पीएम मोदींसाठी एक भावनिक व्हिडिओ बनवला आहे…

हेही वाचा : जळगावमध्ये पुन्हा ‘सैराट’! बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, बहिणीच्या पतीची भावाकडून

विद्यार्थी आंदोलनानंतर पंकजा मुंडेंचा मोदींसाठी भावनिक व्हिडिओ; नेमकं काय म्हणाल्या? ( Pankaja Munde )

देश हाच माझा परिवार आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षण समर्पित केला पाहिजे,” असा संदेश देणारा मंत्री पंकजा मुंडेंचा ( Pankaja Munde ) भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे… अमेरिकेचा दौरा पूर्ण करून थेट बैठकीला पोहोचलेल्या पंतप्रधानांनी तब्बल साडेआठ तास प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला.. विशेष म्हणजे, उपवास असतानाही मोदींनी स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकासकामांवर बारकाईने चर्चा केली. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, राष्ट्रप्रथमचा दृष्टिकोन आणि अविरत कार्यक्षमता प्रेरणादायी असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे… देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याची गरज असल्याचे सांगत सकारात्मकता, समाजहित आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

केंद्र सरकारवर विरोधकांची टीका

तरूणांच्या आंदोलनामुळे भाजपची प्रतिमा खराब झाल्याची चर्चा आहे…भाजप हा गरीबांसाठी लढणारा, सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष, अशी प्रतिमा भाजपची तयार करण्यात आली होती..मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात कोणतंही आंदोलन सुरू झालं की सरकार चर्चा करण्याऐवजी थेट आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते, असा आरोप केला जात आहे…दिल्लीच्या बॉर्डवर शेतकऱ्यांना एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन करावं लागलं…या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो…तसंच देशभरात अनेक ठिकाणी जंगलं कापली जात आहे…या विरोधात सुरू असलेलं आंदोलन देखील चिरडण्यात आलं, असा आरोप आहे…महिला खेळाडूंनी देखील दिल्लीत आंदोलन केलं होतं, त्यांचंही आंदोलन चिरडण्यात आलं…आता NEET पेपरफुटी प्रकरणी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं…केंद्र सरकारने या आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतला..या लाठीचार्जचे व्हिडिओ देशभरासह विदेशातही चर्चेचा विषय ठरले होते…त्यामुळे भाजप आता डॅमेज कंट्रोल म्हणून व्हिडिओ बनवत नागरिकांना भावनिक साद घालत असल्याची चर्चा आहे…तुम्हाला काय वाटतं पीएम मोदी आणि भाजप नेते व्हिडिओ बनवून काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत? कमेंट करून नक्की सांगा…

FAQ

प्र 1. पंकजा मुंडेंचा व्हिडिओ का चर्चेत आला आहे?

विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करणारा भावनिक व्हिडिओ शेअर केला.

प्र 2. जंतरमंतर आंदोलनात काय घडलं?

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटना समोर आल्या असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.

प्र 3. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांबाबत काय प्रतिक्रिया दिली?

बातमीनुसार त्यांनी सोशल मीडियावरून तरुणांबाबत संदेश दिला आणि संयम राखण्याचे आवाहन केल्याची चर्चा आहे.

प्र 4. पंकजा मुंडेंनी व्हिडिओमध्ये काय म्हटलं?

देश प्रथम, विकास आणि पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

प्र 5. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?

विरोधकांनी सरकारवर टीका केली असून भाजपकडून मोदींच्या भूमिकेचं समर्थन करण्यात येत आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts