Breaking News :
  • Home
  • एजुकेशन- जॉब
  • बँकेत नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार! IBPS कडून ११,४०३ लिपिक पदांसाठी मेगाभरती जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
एजुकेशन- जॉब

बँकेत नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार! IBPS कडून ११,४०३ लिपिक पदांसाठी मेगाभरती जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

IBPS Clerk (CSA) Recruitment 2026

IBPS Clerk Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IBPS ने ११ हजार ४०३ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि पात्रतेची माहिती जाणून घेऊया.

तुम्हीही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ( IBPS)ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट (CSA) म्हणजेच लिपिक संवर्गातील ११,४०३ पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे, जाणून घ्या.

हेही वाचा: ऑगस्टमध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मीळ योग; भारतात सूतक लागणार का?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत IBPS च्या www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये (प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा) पार पडणार आहे.

या १० पेक्षा अधिक सरकारी बँकांमध्ये होणार नियुक्त

IBPS CSA Recruitment 2026 अंतर्गत देशातील अनेक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये:

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
पंजाब नॅशनल बँक
पंजाब अँड सिंध बँक
युको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया

यांसह इतर सहभागी बँकांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता (IBPS Clerk Eligibility)

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारमान्य विद्यापीठ किंवा संस्थेची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

२१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उमेदवाराची पदवी पूर्ण झालेली असावी.
संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
संगणकाचे किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज केला आहे, तेथील स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (IBPS Age Limit)

१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय: किमान वय: २० वर्षे, कमाल वय: २८ वर्षे असावे.

आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट

SC/ST प्रवर्ग: ५ वर्षे सूट
OBC प्रवर्ग: ३ वर्षे सूट
दिव्यांग उमेदवार: १० वर्षे सूट

निवड प्रक्रिया (IBPS Selection Process)

IBPS CSA पदांसाठी उमेदवारांची निवड दोन स्तरांतील परीक्षेद्वारे केली जाणार आहे. प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी पात्र ठरवले जाईल. बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती एक मोठी संधी ठरणार आहे.

FAQs

1. IBPS Clerk (CSA) Recruitment 2026 साठी किती पदांची भरती जाहीर झाली आहे?
उत्तर: IBPS ने Customer Service Associate (Clerk) पदासाठी 11,403 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.

2. IBPS Clerk 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: इच्छुक उमेदवार 1 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

3. IBPS Clerk भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराकडे भारत सरकारमान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि संबंधित राज्याची स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे.

4. IBPS Clerk भरतीची निवड प्रक्रिया कशी असते?
उत्तर: निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होते—प्राथमिक परीक्षा (Prelims) आणि मुख्य परीक्षा (Mains). दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील नियुक्ती प्रक्रिया केली जाते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts