Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • EPF नियमांमध्ये होणार मोठा बदल? २५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो फायदा
बिजनेस

EPF नियमांमध्ये होणार मोठा बदल? २५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो फायदा

EPS Scheme

EPS Scheme: EPF संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वेतन मर्यादा वाढल्यास २५ हजार रुपयांपर्यंत बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही EPF आणि EPS योजनेचा लाभ मिळू शकतो.

देशातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी (EPF Rule Change)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) साठी लागू असलेली वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे.

सध्या EPF योजनेसाठी (EPS Scheme) असलेली १५,००० रुपयांची वेतन मर्यादा वाढवून २५ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या प्रस्तवाला मंजुरी मिळाल्यास १५ हजार ते २५ हजार रुपये बेसिक वेतन असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना EPF आणि EPS योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र, हा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

हेही वाचा: तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होऊ शकतो बोन मॅरो! वेळेत सावध व्हा; नाहीतर गंभीर परिणाम

सध्याचा नियम काय आहे?

सध्याच्या नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना EPF आणि EPS योजनेत समाविष्ट करणे बंधनकारक आहे.

यापेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी EPF सदस्यत्व अनिवार्य नसते. त्यामुळे अनेक खासगी क्षेत्रातील कर्मचारी या सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेबाहेर राहतात. जर नवीन मर्यादा 25,000 रुपये करण्यात आली, तर अधिक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार देणाऱ्या या योजनांचा फायदा मिळेल.

सरकारच्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने यापूर्वी EPF वेतन मर्यादा आणखी वाढवण्याचा विचार केला होता. मात्र विविध आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा विचार करून 25,000 रुपयांच्या मर्यादेवर भर देण्यात येत आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास EPF नियमांमध्ये अनेक वर्षांनंतर मोठा बदल होऊ शकतो.

यापूर्वी सप्टेंबर 2014 मध्ये EPF साठीची वेतन मर्यादा 6,500 रुपयांवरून वाढवून 15,000 रुपये करण्यात आली होती.

EPF आणि EPS मध्ये कोणाचे योगदान असते?

EPF आणि EPS योजनांमध्ये कर्मचारी तसेच कंपनीचे योगदान असते.

कर्मचाऱ्याच्या वेतनातून ठराविक रक्कम EPF खात्यात जमा केली जाते.
नियोक्त्याच्या योगदानातील काही भाग कर्मचारी पेन्शन योजनेसाठी (EPS) दिला जातो.
केंद्र सरकारकडूनही EPS साठी योगदान दिले जाते.

वेतन मर्यादा वाढल्यास कर्मचारी, कंपन्या आणि सरकार या तिन्ही घटकांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोणत्या कंपन्यांना लागू होतो EPF नियम?

EPF आणि EPS चे नियम प्रामुख्याने अशा आस्थापनांना लागू होतात, जिथे 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतात.

या संस्थांना पात्र कर्मचाऱ्यांची EPF योजनेत नोंदणी करणे आवश्यक असते.

लहान उद्योग आणि आस्थापनांना या बदलाचा थेट परिणाम होणार नाही. तसेच केंद्र सरकारी कर्मचारी या नियमांच्या कक्षेत येत नाहीत, कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र निवृत्तीवेतन व्यवस्था आहे.

कंपन्यांना मिळणार तयारीसाठी वेळ

नवीन नियम लागू करण्यापूर्वी कंपन्यांना त्यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करावे लागणार आहेत.

यासाठी:

पेरोल सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा
कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल
HR आणि अनुपालन प्रक्रियेतील अपडेट

अशा गोष्टी कराव्या लागतील.

त्यामुळे मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरही नवीन नियम लागू होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. हा बदल 2027 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्मचाऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे हा बदल?

EPF वेतन मर्यादा वाढल्यास खासगी क्षेत्रातील अधिक कर्मचाऱ्यांना बचत आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत होऊ शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts