Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदेंनी 4 मंत्र्यांना झापलं? मंत्रिमंडळ खांदेपालटाचे संकेत, संजय शिरसाटांसह 4 मंत्री चर्चेत
Top News

एकनाथ शिंदेंनी 4 मंत्र्यांना झापलं? मंत्रिमंडळ खांदेपालटाचे संकेत, संजय शिरसाटांसह 4 मंत्री चर्चेत

Eknath Shinde

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या खांदेपालटच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे..सध्या ते 4 मंत्र्यांवर नाराज असून शिंदेंनी बैठक घेत या मंत्र्‍यांना झापल्याची माहिती आहे…ठाकरे गटातून 6 खासदार फुटून शिंदे गटात आले..त्यानंतर आता ठाकरे गटाचे काही आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे..फुटून आलेल्या खासदारांमधील 2 खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे…तर शिंदे गटाच्या संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांनाही मंत्रीपदाचं अमिष दाखवल्या जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे..आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी 4 मंत्र्‍यांना झापत, जनतेची कामे करा, मतदार संघावर लक्ष द्या नाही तर खांदेपालट अटल असल्याचे मंत्र्यांना स्पष्ट सांगितले..त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूंकप होणार का? शिंदे गटात नेमकं काय सुरू आहे? संजय शिरसाट यांना अभिजीत दीपकेंच्या कुटुबांची भेट घेणं महागात पडू शकतं का? ते चार मंत्री कोण आहेत?

प्री-कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना कडक इशारा ( Eknath Shinde )

शिंदे गटाचे नेते काही न काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात…शिंदे गटाचे नेते कधी कुणाला मारहाण करताना दिसतात, तर कधी कुणावर खालच्या भाषेत टीका करताना दिसतात..तर कधी मंत्र्याचा पैशाच्या बॅगा सोबत व्हिडिओ व्हायरल होतो…शिंदे गटाचे नेते चर्चेत राहण्याचे एकही कारण सोडत नाही..आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक घेतली होती..यावेळी एकनाथ शिंदेंनी चार प्रमुख मंत्र्यांची कडक शब्दांत शाळा घेतली आहे… मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची ही प्री कॅबिनेट बैठक पार पडली…यावेळी जनतेची कामे न करणाऱ्या आणि मतदारसंघात दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांना “काम सुधारा, मतदारसंघात लक्ष द्या, अन्यथा खांदेपालट अटळ आहे,” अशा थेट शब्दांत मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा सज्जड दम एकनाथ शिंदेंनी दिला आहे…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या संथ कारभारावर प्रचंड नाराज आहेत… प्री-कॅबिनेट बैठकीत हा राग अनावर झाला… विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाची पीछेहाट रोखण्यासाठी मंत्र्यांनी मंत्रालयात बसून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरणे गरजेचे आहे, अशी तंबी त्यांनी दिल्याची माहिती आहे… केवळ मंत्रीपद मिळाले म्हणून चालणार नाही, जनतेची कामे वेळेत मार्गी लागली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले… जर मतदारसंघात वेळ दिला नाही आणि पक्षसंघटनेची वाढ झाली नाही, तर आगामी काळात खांदेपालट अटळ आहे, अशा अत्यंत कडक शब्दांत शिंदेंनी मंत्र्यांना सुनावले आहे… तसंच, आतापासून दर तीन महिन्यांनी प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि काम न करणाऱ्यांची थेट हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे..

राजकीय वर्तुळात आणि सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) ज्या चार मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराज आहेत, त्यापैकी तीन प्रमुख मंत्र्यांची नावे आता चर्चेत आहेत. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, वने व मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची चर्चा आहे.. तर चौथ्या मंत्र्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही…मात्र हे चौथं नाव गुलाबराव पाटील यांचं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे…गुलाबराव पाटील हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात… या मंत्र्यांच्या विभागातील फाईल्स वेळेवर क्लिअर न होणे, स्थानिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण न करणे आणि मतदारसंघात जनतेशी असलेला संपर्क तुटणे, या प्रमुख कारणांमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत अशी माहिती आहे..

हेही वाचा : धनुष्यबाण’ चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे की ठाकरे

खांदेपालटाच्या चर्चेत कोणते 4 मंत्री आहेत? ( Maharashtra Cabinet Reshuffle )

या संपूर्ण वादात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांचे मंत्रीपद सर्वाधिक धोक्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे… त्याचे मुख्य कारण म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंच्या कुटुंबीयांची संजय शिरसाट यांनी घेतलेली भेट… या आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके आणि विद्यार्थ्यांनी महायुती सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात अत्यंत तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतली होती… असे असतानाही, महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री असूनही संजय शिरसाट यांनी थेट दीपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली… शिरसाट यांच्या या भूमिकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरसाट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे… या बैठकीत शिंदेंनी शिरसाट यांच्या या पाऊलावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे, आगामी संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात शिरसाट यांचे मंत्रीपद जाण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे गटातील आमदार शिंदे गटाच्या संपर्कात?

उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्यांना दिलेल्या या फायनल वॉर्निंगमुळे आणि मंत्रिमंडळात होणाऱ्या संभाव्य खांदेपालटामुळे शिंदे गटात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे.. दुसरीकडे, ठाकरे गटातून 6 खासदार फुटून शिंदे गटात आल्यानंतर, आता ठाकरे गटाचे काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे..या 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे… तर या संपर्कात असलेल्या आमदारांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मोठी पदे किंवा मंत्रिपदाचे अमिष दाखवून पक्षात ओढण्याची शक्यता वर्तवली जात आहे… त्यामुळे काम न करणाऱ्या जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन, नवीन येणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसांत आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे…

आता सध्या जी 4 मंंत्र्यांची नावे चर्चेत आहेत, त्या मंत्र्यांना डच्चू मिळेल असेही नाही…शिंदेंनी फक्त त्यांना दम दिला आहे..संजय शिरसाट यांनी दीपकेंची भेट घेतल्याने जरी सध्या एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे..मात्र शिंदेंना विचारल्या शिवाय संजय शिरसाट, आमदार बच्चू कडू दीपकेंच्या भेटीला जाऊ शकत नाही, असं म्हटलं जात आहे…शिंदे गट अभिजीत दीपकेंशी जवळीक साधत तरूणांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे..भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून अभिजीत दीपकेंना आपल्या बाजूने वळवू शकतं, असंही म्हटलं जात आहे…तर संजय राठोड यांच्या पाठीमागे बंजारा समाजाची मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांना बाजूला करणं अवघड आहे..तर दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याबाबत सध्या सांगणे सध्या मुश्किल आहे..पण याच मंत्र्यांवर शिंदे नाराज आहे का? याची अधिकृत माहिती सध्या तरी समोर आलेली नाही..त्यामुळे शिंदे कोणत्या 4 मंत्र्यांना डच्चू देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts