Breaking News :
  • Home
  • Top News
  • NEET वाद, विद्यार्थी आंदोलन अन् राजीनामा; धर्मेंद्र प्रधानांनी २ आठवड्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
राजकारण

NEET वाद, विद्यार्थी आंदोलन अन् राजीनामा; धर्मेंद्र प्रधानांनी २ आठवड्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Dharmendra Pradhan News
Dharmendra Pradhan News: NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं. राजीनाम्यामागचं खरं कारणही सांगितलं.

Dharmendra Pradhan News: NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या (student protests) पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षणमंत्री पदावरून बाजूला झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. भुवनेश्वरमधील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना प्रधान यांनी Gen Z, विद्यार्थी आंदोलन आणि आपल्या राजीनाम्याबाबत महत्वाची विधानं केलं.

हेही वाचा: पार्थ पवारांकडून तटकरेंचा गेम? प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला राष्ट्रवादीत कल्ला

‘Gen Z’ला चुकीच्या पद्धतीने प्रभावित करण्याचा प्रयत्न

विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देताना धर्मेंद्र प्रधान यांनी काही घटकांनी तरुण पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र, Gen Z पिढीबद्दल आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांच्या मते, आजची तरुण पिढी स्वतःच्या आकांक्षा आणि अपेक्षा घेऊन पुढे येत आहे. भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मुलांचा जन्म होतो आणि मागणी दशकात कोट्यवधी तरुण देशाच्या लोकसंख्येत सहभागी झाले आहेत. हीच पिढी भविष्यात भारताच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताला जागतिक पातळीवर अधिक सक्षम बनवण्यात Gen Z महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असंही प्रधान यांनी नमूद केलं.

मंत्रिपदावर म्हणाले की (Dharmendra Pradhan statement)

शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा का दिला, यावरही धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan resignation) यांनी स्पष्टीकरण दिलं. पदापेक्षा देशातील तरुणांचं भविष्य आणि आपल्यावर असलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.

आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा (Dharmendra Pradhan resignation) देण्याची तयारी व्यक्त केली होती, असा दावा प्रधान यांनी केला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या कारणांबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी स्वतःच्या वक्तव्याद्वारे उत्तर दिलं.

नवीन पटनाईक आणि BJDवरही निशाणा

ओडिशातील आणखी एका कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान यांनी माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्यावर टीका केली.

रायराखोलमध्ये प्रधान यांच्या दौऱ्याला विरोध करत काही BJD युवा आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. यावेळी ‘धर्मेंद्र प्रधान गो बॅक’ अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना प्रधान यांनी आपण शेतकरी कुटुंबातून आलो असल्याचं सांगितलं. विरोधकांनी आपल्याला परत जाण्यास सांगितलं तरी आपण ओडिशाच्या जनतेसाठी काम करत राहू, असा संदेश त्यांनी दिला.

आपल्या कामामुळे ओडिशाच्या जनतेची मान खाली जाईल, असं कोणतंही कृत्य आपण केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

नवीन पटनाईक आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी तरुणांचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोपही प्रधान यांनी केला.

NEET वादानंतर पहिल्यांदाच सविस्तर भूमिका

NEET पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यांना वेग आला.

या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांचं ताजं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. विशेषतः राजीनामा, विद्यार्थी आंदोलन आणि Gen Z संदर्भातील त्यांच्या विधानांमुळे या विषयावर पुन्हा राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts