Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मोदी, शाह, राहुल गांधी एकाचवेळी रिसेप्शनमध्ये; सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल
मनोरंजन

मोदी, शाह, राहुल गांधी एकाचवेळी रिसेप्शनमध्ये; सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल

Supriya Sule Daughter Reception
Supriya Sule Daughter Reception: सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनला देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

सुप्रिया सुळे यांच्या मुलगी (Supriya Sule daughter reception) रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला होता. त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.

मोदी 20 मिनिटे उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावत पवार कुटुंबीयांची भेट घेतली. मोदी या कार्यक्रमात सुमारे 20 मिनिटे उपस्थित होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात काही वेळ संवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: वजन घटवायचं आहे? सकाळच्या नाश्त्यात आवर्जून खा ‘हे’ हेल्दी सॅलेड; लगेच नोट करा रेसिपी!

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी

विशेष म्हणजे, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी (Narendra Modi) एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. मोदी यांनी सुप्रिया सुळे (Revati Sule) यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत फोटोही काढला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत.

दरम्यान, अमित शाह यांनीही रिसेप्शनमध्ये उपस्थिती लावली. अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही अनौपचारिक चर्चा झाल्याचे दिसून आले. शाह हे पवार यांच्या शेजारी जाऊन बसले होते.

राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी रिसेप्शनमध्ये

या कार्यक्रमात राहुल गांधी (Rahul Gandhi) , सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी रिसेप्शनमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह मंचावर आले, त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खाली उपस्थित होते.

याच दिवशी सकाळी काय झालं?

याच दिवशी सकाळी शरद पवार यांच्या गटातील आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्याच दिवशी रात्री पवार कुटुंबीयांच्या खासगी सोहळ्यात मोदी आणि शरद पवार यांची झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली.

रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शन (Revati Sule And Sarang Lakhani Reception)

रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनमधील राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एकाच कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते दिसल्याने या रिसेप्शनला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

FAQs

1. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनला कोण-कोण उपस्थित होते?
उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेते उपस्थित होते.

2. रेवती सुळे यांच्या पतीचे नाव काय आहे?
उत्तर: रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखाणी यांच्याशी झाला असून दिल्लीत त्यांच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.

3. या रिसेप्शनची राजकीय चर्चा का झाली?
उत्तर: सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने या सोहळ्याची मोठी राजकीय चर्चा झाली.

4. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट का चर्चेत आली?
उत्तर: रिसेप्शनमध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी संवाद साधला तसेच त्याच दिवशी सकाळी शरद पवार गटाच्या खासदारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts