Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • यंदा गटारी अमावस्या २०२६ कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व
संस्कृती

यंदा गटारी अमावस्या २०२६ कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि धार्मिक महत्त्व

Gatari Amavasya 2026
129
Gatari Amavasya 2026: यंदा गटारी अमावस्या कोणत्या दिवशी आहे? या दिवसाला ‘गटारी’ का म्हणतात आणि त्यामागची धार्मिक परंपरा काय आहे? जाणून घेऊया.

श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल लागली की महाराष्ट्रात गटारी अमावस्येचीही चर्चा सुरू होते. आषाढ महिन्याच्या (Ashadha Amavasya 2026) शेवटी येणारी ही अमावस्या अनेकांसाठी खास असते. मात्र गटारी अमावस्या  नेमकी कधी असते, तिला गटारी (Gatari Amavasya 2026) हे नाव कसे पडले, या दिवशी मांसाहार करण्याची प्रथा का आहे आणि या दिवसाला धार्मिकदृष्ट्या (Ashadha Amavasya significance) किती महत्व आहे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.

काही ठिकाणी हा दिवस मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत एकत्र येऊन साजरा केला जातो, तर धार्मिक परंपरेनुसार हा दिवस श्रावणातील (Shravan 2026) सयंम आणि सात्त्विक आहाराच्या सुरुवातीशी जोडला जातो. त्यामुळे गटारी अमावस्या (Gatari Amavasya) केवळ खाण्यापिण्याचा दिवस नसून तिच्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरागत संदर्भही आहेत. यंदा गटारी अमावस्या नेमकी कधी आहे आणि या दिवसाचे महत्त्व काय, जाणून घेऊया.

हेही वाचा: ग्रहांची मोठी उलथापालथ! सूर्य-केतूच्या युतीने ‘या’ राशींचं टेन्शन वाढणार; करिअर-पैशांबाबत सावध राहा

२०२६ मध्ये अमावस्या कधी? (Gatari Amavasya 2026)

२०२६ च्या पंचांगानुसार अमावस्या (Amavasya timings) तिथी १२ ऑगस्ट २०२६, बुधवारी रोजी आहे. तिथी १२ ऑगस्टच्या पहाटे सुमारे १ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होऊन रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होते. म्हणून धार्मिक विधी आणि अमावस्येशी संबंधित आचारांसाठी १२ ऑगस्ट हा दिवस महत्वाचा मानला जातो.

‘गटारी’ हे नाव नेमकं कसं पडलं?

‘गटारी’ (Gatari meaning) या नावाबाबत महाराष्ट्रात विविध लोककथा आणि विनोद अर्थ सांगितले जातात. त्यापैकी एक लोकप्रिय समज म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि मांसाहार केला जातो, त्यामुळे ‘गटारी’ हे नाव पडले.

मात्र हा अर्थ प्रामुख्याने लोकप्रचलित विनोदाच्या स्वरूपात पाहिला जातो. धार्मिक परंपरेत अमावस्येला अशा प्रकारे नाव पडल्याचा ठोस ऐतिहासिक आधार उपलब्ध नाही.

काही ठिकाणी ‘गटारी’ शब्दाचा संबंध ‘गतहारी’ या संकल्पनेशी जोडला जातो. म्हणजेच पुढील काळात त्याग करावयाच्या आहाराचा शेवटचा दिवस. श्रावण महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये आहार-विहाराबाबत संयम पाळण्याची परंपरा असल्याने अमावस्येच्या दिवसाला असा सांस्कृतिक संदर्भ जोडला गेला असावा. Ls Marathi Youtube Channel

आषाढ अमावस्येचे धार्मिक महत्त्व (Ashadha Amavasya significance)

अमावस्या तिथीला हिंदू परंपरेत हा दिवस पितरांचे स्मरण, तर्पण आणि दानधर्म यांना महत्त्व दिले जाते. तसेच अनेक ठिकाणी दीपपूजा आणि घरातील दिव्यांची पूजा करण्याची परंपराही आढळते.

अशा प्रकारे पाहिल्यास आषाढ अमावस्या (Ashadha Amavasya 2026) ही केवळ ‘गटारी’ म्हणून साजरी करण्याचा दिवस नसून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेली अमावस्या आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts