• Home
  • ताज्या बातम्या
  • काकाचा जीव घेतला, मृतदेह लपवला अन् स्वतःच पोलिसांसमोर पोहोचला; मुंबईत धक्कादायक प्रकार
Mumbai

काकाचा जीव घेतला, मृतदेह लपवला अन् स्वतःच पोलिसांसमोर पोहोचला; मुंबईत धक्कादायक प्रकार

Mumbai Khar Murder Case
3
Mumbai Khar Murder Case: मुंबईतील खार परिसरात ३५ वर्षीय बांधकाम मजुराच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवल्यानंतर मृताचा १७ वर्षे ८ महिन्यांचा पुतण्या स्वतःच पोलिसांसोबत पोहोचला.

मुंबईतील खार पश्चिम परिसरात बांधकामस्थळी एका ३५ वर्षीय मजुराचा मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा खार पोलिसांनी तपास केल्यानंतर मृत व्यक्तीच्या अल्पवयीन पुतण्याचाच या घटनेत सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबधावरून निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा: ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! मातोश्रीच्या बैठकीला कळंबचे 10 नगरसेवक गैरहजर; भाजपच्या वाटेवर?

सिमेंटच्या गोण्यांखाली आढळला मृतदेह

१८ ऑगस्ट रोजी दुपारी पश्चिम नियंत्रण कक्षाला खार पश्चिमेतील रोड क्रमांक ७ परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता रविशंकर नंदकिशोर गिरी (३५) हा बांधकाम मजूर मृतावस्थेत आढळला.

घटनेनंतर खार पोलिसांनी प्रकरणाची नोंदकरून तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक माहिती तसेच तेथे काम करणाऱ्या इतर मजुरांकडून पोलिसांनी माहिती घेतली.

पुतण्याच्या जबाबामुळे पोलिसांचा संशय वाढला

घटनेनंतर मृताचा पुतण्या सुरुवातीला पोलिसांसमोर तक्रारदाराच्या भूमिकेत होता. मात्र, त्याच्या वर्तनात आणि जबाबामध्ये काही विसंगती आढळून आल्याने तपास पथकाचा संशय त्याच्याकडे वळला.

पोलिसांनी त्याच्या हालचाली आणि घटनाक्रमाची पडताळणी केली. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि इतर व्यक्तींच्या चौकशीतून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगण्यात आले.

अल्पवयीन पुतण्याला ताब्यात

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताचे वय 17 वर्षे 8 महिने असून तो मृताचा पुतण्या आहे. 17 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तपासात रविशंकर गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या आणि इतर साहित्याखाली लपवण्यात आल्याचे समोर आले आहे.

संबंधांच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

या घटनेमागे अनैतिक संबंधांशी संबंधित वाद असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts