Lax Gopisetty Missing: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बसला आहे. याचदरम्यान इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीचा ( Nepal Floods) फटका अनेक नागरिकांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीदरम्यान इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे CEO लॅक्स गोपीसेट्टी (Infosys CEO) यांच्याशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. ते वैयक्तिक कारणासाठी नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. पुरानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
इन्फोसिसने गोपीसेट्टी (Lax Gopisetty Missing in Nepal Floods) सध्या संपर्काबाहेर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या शोधासाठी स्थानिक प्रशासन तसेच संबंधित सरकारी यंत्रणांशी कंपनीकडून समन्वय साधला जात आहे. त्याचबरोबर गोपीसेट्टी यांच्या कुटुंबीयांशीही कंपनी सातत्याने संपर्कात असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. (Infosys Nepal new)
हेही वाचा: यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ की ५ सप्टेंबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मलबा आणि खराब हवामानामुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. (Lax Gopisetty latest news)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही नेपाळमधील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. उपलब्ध माहितीनुसार, या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेकडो भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. काही भारतीय नागरिक तिबेट सीमेजवळील भागात अडकल्याचीही माहिती आहे.
भारताकडून मदतीची तयारी
नेपाळमधील बचाव आणि मदतकार्याला हातभार लावण्यासाठी भारताने आवश्यक ती मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. इतर काही देशांकडूनही बचाव पथके आणि तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान, लॅक्स गोपीसेट्टी यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांसह इन्फोसिसकडून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. नेपाळमधील पूरस्थिती निवळल्यानंतर बेपत्ता नागरिकांबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





