एजुकेशन- जॉब

SBI PO Score Card 2026 जाहीर; असा चेक करा तुमचा स्कोअर आणि कट-ऑफ

SBI PO Score Card 2026
31
SBI PO Score Card 2026 काल १ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रिलिम्स परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता अधिकृत वेबसाइटवर लॉगिन स्कोअर तपासता येणार आहे. कसे ते जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI PO भरती २०२६ च्या प्रिलिम्स परीक्षेचे स्कोअरकार्ड ((SBI PO Score Card 2026) जाहीर केले आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून आपले गुण पाहता येत आहेत. स्कोअरकार्डमध्ये SBI PO Cut Off 2026) एकूण गुणांसोबत प्रत्येक विभागात मिळालेले मार्क्स आणि उमेदवार पात्र ठरला आहे की नाही, याची माहिती देण्यात आली आहे.

SBI PO Prelims परीक्षा १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी जवळपास ११ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी १५,८०२ उमेदवारांनी पुढील टप्प्यातील म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. (SBI PO Result 2026)

हेही वाचा: वय वाढलं तरी चेहरा चमकेल! फक्त 4 घटकांतून तयार करा ‘DIY बोटॉक्स जेल’

महत्वाचे म्हणजे, प्रिलिम्समध्ये पात्र ठरवलेल्या उमेदवारांसोबतच परीक्षेत यश न मिळवलेल्या उमेदवारांनाही आपले स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेतील स्वतःच्या कामगिरीचे मूल्यांकन करता येईल.

स्कोअरकार्डमध्ये काय पाहायला मिळेल?

SBI PO Prelims Score Card मध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, रजिस्ट्रेशन क्रमांक आणि प्रवर्गाची माहिती दिली जाते. याशिवाय English Language, Quantitative Aptitude आणि Reasoning Ability या विभागांमध्ये मिळालेले गुण तसेच एकूण स्कोअर दाखवला जातो. यासोबतच SBI ने विविध प्रवर्गांसाठी प्रिलिम्सची कट-ऑफ गुणसंख्याही जाहीर केली आहे. उमेदवार आपल्या गुणांची तुलना संबंधित कट-ऑफशी करून परीक्षेतील कामगिरीचा अंदाज घेऊ शकतात.

SBI PO Score Card 2026 ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे? (SBI PO Score Card Download)

सर्वप्रथम SBIच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.bank.in/ वर जा.
Careers या विभागावर क्लिक करा.
त्यानंतर Current Openings हा पर्याय निवडा.
SBI PO 2026 भरतीशी संबंधित नोटिफिकेशन शोधा.
Preliminary Examination Score Card ची लिंक उघडा.
रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड अथवा जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
Captcha भरल्यानंतर सबमिट करा.
स्क्रीनवर तुमचे SBI PO Prelims Score Card दिसेल.
स्कोअरकार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट किंवा डिजिटल प्रत जतन करून ठेवा.

पुढील प्रक्रिया काय?

प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेल्या १५,८०२ उमेदवारांची निवड आता SBI PO भरतीच्या पुढील टप्प्यासाठी झाली आहे. या उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी स्कोअरकार्डसोबत पुढील परीक्षेचे वेळापत्रक आणि SBIकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts