Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • वरुण तेजचा ‘कोरियन कनकराजू’ OTTवर; जाणून घ्या सिनेमा कुठे आणि कधी पाहता येणार?
मनोरंजन

वरुण तेजचा ‘कोरियन कनकराजू’ OTTवर; जाणून घ्या सिनेमा कुठे आणि कधी पाहता येणार?

Korean Kanakaraju OTT
25
Korean Kanakaraju OTT: वरुण तेज आणि ऋतिका नायक यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कोरियन कनकराजू’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होणार आहे. थिएटरनंतर हा सिनेमा थेट Netflix वर पाहता येणार असून, रिलीजची तारीखही समोर आली आहे.

साऊथ अभिनेता वरुण तेजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचा ‘कोरियन कनकराजू’ हा चित्रपट (Korean Kanakaraju OTT) आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मर्लापाका गांधी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात हॉरर, कॉमेडी, अॅक्शन आणि रोमॅंटिक कथानकाचा मिलाफ पाहायला मिळतो. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता काही आठवड्यानंतर त्याचा OTT प्रिमिअम होणार आहे.

हेही वाचा: वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका, ‘या’ गंभीर आजाराचा संकेत असू शकतो

या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

‘कोरियन कनकराजू’ हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ पासून Netflix वर स्ट्रीमिंगसाठी (Korean Kanakaraju OTT Release) उपलब्ध होईल. त्यामुळे घरबसल्या हा सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा चित्रपट सुमारे २ तास ४२ मिनिटेंचा आहे. मूळ चित्रपट तेलगू भाषेत असून, OTT वर तो इतर भाषांमध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘कोरियन कनकराजू’मध्ये वरुण तेजने (Varun Tej Movie) कनकराजूची भूमिका साकारली आहे. तो स्वभावाने तापट मात्र मनाने बेफिकीर तरुण असून, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासोबत पारंपरिक भजना पथक चालवतो.

कनकराजूचे चैतन्यावर (Korean Kanakaraju) प्रेम असते. चैतन्य मोटर प्लांटमध्ये काम करते आणि दक्षिण कोरियाला जाण्याचे तिचे स्वप्न असते. कोरियन संस्कृती, K-pop आणि K-drama ची ती चाहती असते. मात्र, एका कोरियन व्यक्तींशी संबंधित विचित्र घटनेनंतर कनकराजूचे आयुष्य पूर्णपणे बदलते. तो एका वस्तूतील पदार्थ सेवन करतो आणि त्याच्यावर त्या कोरियन व्यक्तीच्या आत्म्याचा प्रभाव पडतो. यानंतर कोणीही कोरियाबद्दल बोलले की कनकराजूमध्ये अविश्वसनीय वेग आणि मार्शल आर्ट्सची कौशल्ये दिसू लागतात. त्याच्यात तलवारबाजीचे कौशल्यही विकसित होते.

या आत्म्याचे एक अपूर्ण काम असते, जे केवळ दक्षिण कोरियामध्ये पूर्ण होऊ शकते. आपले पूर्वीचे आयुष्य परत मिळवण्यासाठी कनकराजू चैतन्या आणि त्याचा फोटोग्राफर मित्र कृष्णप्पासोबत कोरियाला जातो. आत्म्याला नेमके काय हवे आहे, हे शोधून त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आव्हान कनकराजूसमोर असते.

कोणकोणते कलाकार?

‘कोरियन कनकराजू’मध्ये (Korean Kanakaraju) वरुण तेज आणि ऋतिका नायक मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत सत्य, सुनील वर्मा, दक्ष नागरकर, VTV गणेश, महेश आचंता आणि श्रीनिवास आवसाराला यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

मर्लापाका गांधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, संगीताची जबाबदारी थमन यांनी सांभाळली आहे. थिएटरमधील प्रदर्शनानंतर आता OTTवर हा चित्रपट उपलब्ध होत असल्याने वरुण तेजच्या चाहत्यांसह हॉरर-कॉमेडी आणि अॅक्शनपटांचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांना तो घरबसल्या पाहता येणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts