Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Krishna Janmashtami 2026: आज मध्यरात्री जन्मणार बाळकृष्ण! जाणून घ्या जन्माष्टमीचा अचूक मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
संस्कृती

Krishna Janmashtami 2026: आज मध्यरात्री जन्मणार बाळकृष्ण! जाणून घ्या जन्माष्टमीचा अचूक मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Krishna Janmashtami 2026
42
Krishna Janmashtami 2026: उद्या देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्णाच्या जन्माची आतुरता असलेल्या भाविकांसाठी यंदाचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या पवित्र दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.

“मुरलीच्या सुरांनी गोकुळ सजलं,
कान्हाच्या आगमनाने भक्तिमय आभाळ भरलं,
नंदलालाच्या जन्माची भक्तांना लागली आस,
जन्माष्टमीच्या उत्सवाने दरवळला आनंद खास…”

श्रावण- भाद्रपद महिना म्हटलं की सण- उत्सवांची लगबग सुरू होते… याच उत्साहात येणारा महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami News) , अर्थातच गोकुळाष्टमी.. कृष्णभक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो.. कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी धार्मिक श्रद्धा आहे… त्यामुळे बाळकृष्णाच्या जन्मसोहळ्याशी (Janmashtami 2026) भक्तांना आतुरता लागलेली असते… दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या (Krishna Janmashtami 2026) अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते.. यंदा हा पवित्र उत्सव 4 सप्टेंबर 2026 रोजी साजरा होणार आहे.. मग श्रीकृष्ण जन्मपूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता? पूजा कशी करावी आणि या दिवसाचं धार्मिक महत्त्व काय आहे? जाणून घेऊया…

हिंदू पंचांगानुसार, (Hindu Festivals 2026) शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami Muhurat) उत्सव साजरा केली जाणार आहे. भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण येतो. यंदा अष्टमी तिथी 4 सप्टेंबरला पहाटे 2:25 वाजता सुरू होईल आणि 5 सप्टेंबरला रात्री 12:13 वाजता समाप्त होईल. जन्माष्टमीच्या (Krishna Puja Vidhi) दिवशी रोहिणी नक्षत्रालाही विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार रोहिणी नक्षत्र 4 सप्टेंबरला मध्यरात्री 12:29 पासून रात्री 11:04 वाजेपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: Drishyam The Conclusion: अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला CBFCची हिरवी झेंडी; कधी आणि कुठे होणार लॉन्च?

रात्रीच्या पूजेसाठी हा काळ शुभ

श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास केली जाणारी पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

जन्मपूजेचा शुभ काळ

4 सप्टेंबर रात्री 11:57 ते 5 सप्टेंबर मध्यरात्री 12:43

या कालावधीत भक्त बाळकृष्णाचा अभिषेक करून जन्मोत्सव साजरा करू शकतात. त्यानंतर आरती आणि नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते? (Krishna Birth Ceremony)

धार्मिक कथांनुसार, मथुरेचा राजा कंस याच्या अत्याचारातून लोकांची सुटका करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला. देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेवांनी त्यांना गोकुळात नंद-यशोदेकडे पोहोचवले.

श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भक्त उपवास, जप, भजन, कीर्तन आणि विशेष पूजाविधी करतात. अनेक ठिकाणी मध्यरात्री कृष्णजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो.

घरच्या घरी बाळकृष्णाची पूजा कशी करावी?

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच घरात पूजेची तयारी केली जाते. देवघर स्वच्छ करून बाळकृष्णासाठी छोटासा पाळणा सजवला जातो.

मध्यरात्रीच्या पूजेसाठी बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालून सजवावी. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करून फुले, तुळशीची पाने आणि मोरपिस अर्पण करावे. ( LS Marathi News Channel )

कृष्णाला लोणी आणि साखरेपासून तयार केलेला माखन-मिश्रीचा नैवेद्य विशेष प्रिय असल्याची श्रद्धा आहे. यासोबत खीर, पंजिरी, फळे आणि इतर सात्त्विक पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवता येतात.

मध्यरात्री बारा वाजता कृष्णजन्माची पूजा करून बाळगोपाळाला पाळण्यात ठेवून झोका देण्याची प्रथा आहे. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करून प्रसादाचे वाटप केले जाते. (Hindu Festivals 2026)

जन्माष्टमीला उपवास कसा करतात?

अनेक भाविक जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवतात. काही जण फक्त फलाहार करतात, तर काही भक्त मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

उपवास आणि पारणाची पद्धत प्रत्येक कुटुंबातील परंपरा तसेच स्थानिक पंचांगानुसार बदलू शकते. त्यामुळे धार्मिक विधी करताना आपल्या परंपरेनुसार योग्य वेळ आणि पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे भक्तिभाव, नामस्मरण आणि पूजाविधीसह जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts