वैभव पारवे, धाराशिव प्रतिनिधी
Naldurg Fort Incident: नळदुर्ग किल्ल्यावर (Naldurg Fort News) तीन मुलांसह महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत आईसह एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, दोन मुली गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय? चला तर जाणून घेऊया.
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह उडी घेतल्याची धक्कादायक (Naldurg Fort Woman Incident) घटना घडली आहे. या दुर्घटनेत आईसह एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
उमरगा तालुक्यातील वंताळा येथील अश्विनी तानाजी मोहिते या 30 वर्षीय महिला गुरुवारी आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्ल्याच्या उंच तटबंदीवर गेल्यानंतर त्यांनी अचानक तीनही मुलांसह खाली उडी घेतल्याची माहिती आहे.
उंच तटबंदीवरून खाली पडल्याने चौघांनाही गंभीर दुखापत झाली. आवाज ऐकताच किल्ल्यावर उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. Ls Marathi News Channel
या घटनेत अश्विनी मोहिते आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघींनाही धाराशिवच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या दोन्ही मुलींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



