Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गौरी-गणपतीसाठी घर सजवायचंय? कमी बजेटमध्ये करा ‘या’ सुंदर डेकोरेशन आयडिया
Ganeshotsav 2026

गौरी-गणपतीसाठी घर सजवायचंय? कमी बजेटमध्ये करा ‘या’ सुंदर डेकोरेशन आयडिया

Ganpati Decoration 2026
39

Ganpati Decoration 2026 : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सजावटीच्या सामानासाठी मार्केटमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत आहे. अशावेळी कमी बजेटमध्ये घराची सुंदर आणि आकर्षक सजावट करण्याचा विचार करत असाल, तर या भन्नाट डेकोरेशन आयडिया एकदा नक्की पाहा.

यंदा गणपती बाप्पांचे आगमन १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि आनंदासोबतच घराची सुंदर सजावट करण्याचीही एक खास संधी. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी घरातील प्रत्येक कोपरा सजवण्याची लगबग सुरू होते. विशेषतः गौरी-गणपतीच्या दिवसांत मखर, फुलांची आरास, रोषणाई आणि पारंपरिक सजावटीला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे बाजारातही विविध प्रकारचं डेकोरेशन मटेरियल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.

मात्र, सुंदर सजावट करण्यासाठी नेहमीच मोठं बजेट असण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या जुन्या साड्या, रंगीत कागद, फुलं, पणत्या, लाईट्स, कार्डबोर्ड आणि नैसर्गिक वस्तूंचा कल्पकतेने वापर करून कमी खर्चातही आकर्षक मखर तयार करता येऊ शकतं. यंदा गौरी-गणपतीसाठी काहीतरी वेगळं आणि बजेटमध्ये सजावट करण्याचा विचार करत असाल, तर या सोप्या, सुंदर आणि क्रिएटिव्ह डेकोरेशन आयडिया तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

जुन्या साड्यांचा करा उपयोग ( Ganpati Decoration 2026 )

घरात वापरात नसलेली सुंदर साडी किंवा दुपट्टा असेल तर त्याचा वापर बॅकड्रॉप म्हणून करता येतो. त्यावर फुलांच्या माळा, लाईट्स किंवा कागदी सजावट लावून आकर्षक मखर तयार करता येईल. यामुळे कमी खर्चात पारंपरिक लूक मिळतो..

हेही वाचा : पुण्यात गणेशोत्सवात कुठले गणपती पाहायचे? मानाचे ५ गणपती ते दगडूशेठ; जाणून घ्या संपूर्ण यादी”

थर्माकोलऐवजी कार्डबोर्डचा वापर

मखर तयार करण्यासाठी महागड्या सजावटीच्या साहित्याची आवश्यकता नाही. मजबूत कार्डबोर्डचा वापर करून कमानी, मंदिराची रचना किंवा बॅकड्रॉप तयार करता येतो. त्यावर रंगीत कागद, फुलं आणि लाईट्स लावून सजावट पूर्ण करता येईल.

जुन्या वस्तूंचा करा क्रिएटिव्ह वापर ( Unique Ganpati Decoration )

घरातील जुन्या बाटल्या, काचेच्या बरण्या, पेपर कप किंवा कार्डबोर्ड बॉक्स फेकून देण्याऐवजी त्यांचा सजावटीसाठी वापर करा. रंग, कागद आणि रिबीनच्या मदतीने या वस्तूंना आकर्षक रूप देता येईल.

मातीच्या पणत्यांनी सजवा मखर

गणपतीच्या सजावटीत मातीच्या पणत्यांचा वापर केल्यास पारंपरिक वातावरण निर्माण होतं. पणत्या आकर्षक रंगांनी सजवून मखराच्या आजूबाजूला ठेवू शकता. संध्याकाळी त्यामध्ये दिवे लावल्यास सजावट आणखी सुंदर दिसते.

बांबूच्या टोपल्या आणि टोपल्यांचा वापर ( Home Made Decoration )

बांबूच्या टोपल्या, परड्या किंवा छोट्या बास्केटचा वापर सजावटीसाठी करता येतो. त्यामध्ये फुलं, कृत्रिम पानं किंवा दिवे ठेवून मखराभोवती सजावट केली तर एक सुंदर आणि हटके थीम तयार होऊ शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts