Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नोकरदारांनो, पगार २१ हजारांपर्यंत? मग मिळू शकतो हजारोंचा बोनस; जाणून घ्या पात्रता अन् संपूर्ण नियम!
बिजनेस

नोकरदारांनो, पगार २१ हजारांपर्यंत? मग मिळू शकतो हजारोंचा बोनस; जाणून घ्या पात्रता अन् संपूर्ण नियम!

Employee Bonus Rules
17
Employee Bonus Rules: २१ हजार रुपयांपर्यंत मासिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही पात्र कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळू शकतो. मात्र, हा बोनस नेमका किती मिळेल आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? चला, जाणून घेऊया.

नोकरदारांसाठी बोनससंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. दरमहा २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हा लाभ मिळण्यासाठी काही ठराविक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा पगार या मर्यादित असेल, तर बोनससाठी (Employee Bonus Rules) तुम्ही पात्र आहात का, हे तपासणे महत्वाचे ठरणार आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनसच लाभ?

वेतन आणि बोनसाशी संबंधित नियमांनुसार, ठराविक वेतन मर्यादेत येणाऱ्या आणि आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळू शकतो. बोनसच्या पात्रतेसाठी संबंधित आर्थिक वर्षात किमान ३० दिवस काम केलेले असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, केवळ २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार आहे म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस आपोआप मिळेल असे नाही. संस्थेला लागू असलेल्या नियमांनुसार पात्रता तपासली जाते.

बोनसची रक्कम कशी ठरते?

पात्र कर्मचाऱ्यांसाठी बोनसचा दर किमान ८.३३ टक्के ते कमाल २० टक्के असू शकतो. बोनसची गणना करताना दरमहा ७ हजार रुपये किंवा संबंधित कर्मचाऱ्याला लागू असलेले वेतन, यापैकी जी रक्कम जास्त असेल ती आधारभूत रक्कम मानली जाऊ शकते.

उदाहरण म्हणून, एखाद्या पात्र कर्मचाऱ्याने वेतन १२ हजार असेल आणि त्याच रकमेचा गणनेसाठी आधार घेतला गेला, तर ८.३३ टक्के दरानुसार वार्षिक बोनसाची रक्कम अंदाजे ११,९९५ रुपये होऊ शकते.

बोनस मिळण्याची अंतिम मुदत काय?

बोनस देण्याबाबतही निश्चित कालमर्यादा आहे. संबंधित आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आठ महिन्यांच्या आत बोनस देण्याची तरतूद आहे. विशेष परिस्थितीत सक्षम मंजुरी मिळाल्यास या कालावधीत बदल होऊ शकतो.

त्यामुळे २१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ पगाराची मर्यादा न पाहता आपली पात्रता, काम केलेले दिवस, लागू वेतन आणि कंपनीतील संबंधित नियम तपासणे गरजेचे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts