Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ६० किलो गांजा अन् स्कॉर्पिओ जप्त! कवठे येमाईत पोलिसांचा तस्करीवर मोठा वार
गुन्हा

६० किलो गांजा अन् स्कॉर्पिओ जप्त! कवठे येमाईत पोलिसांचा तस्करीवर मोठा वार

Shirur Ganja Seized
12

सचिन धुमाळ | शिरूर प्रतिनिधी 

Shirur Ganja Seized : शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६० किलो गांजा जप्त केला आहे. कवठे येमाई ( Kavthe Yemai ) येथे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली असून, पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२) याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईची आखणी केली. माहितीची खातरजमा केल्यानंतर कवठे येमाई परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली.

शिरूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई ( Shirur Ganja Seized )

पोलिसांनी शितोळे यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. तपासणीत तब्बल ६० किलो गांजा मिळून आल्याने पोलिसांनी अमली पदार्थांसह स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले आणि शितोळे याला अटक केली.

या कारवाईनंतर आता पोलिसांसमोर केवळ गांजा जप्त करण्यापुरतेच नव्हे, तर या अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हा गांजा नेमका कुठून आणण्यात आला? तो कोणाला पोहोचविला जाणार होता? यामागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी कार्यरत आहे का? तसेच शिरूर तालुक्यात अमली पदार्थांचा मोठा नेटवर्क कार्यरत आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे गणेशोत्सव सुरळीत; पुण्यात ७,२०० पोलिसांचा फौजफाटा, AI कॅमेऱ्यांची नजर

गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा तपास सुरू

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिरूर शहरात एमडी ड्रग्सविरोधातही कारवाई झाली होती. त्यातच तालुक्यात गोळीबार, हल्ले आणि खुनाच्या घटना समोर येत असताना आता तब्बल ६० किलो गांजा जप्त झाल्याने अमली पदार्थांची तस्करी हा मुद्दाही पोलिसांसमोर गंभीर बनला आहे.

औद्योगिक विकासामुळे शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक बदल झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रे आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त, माहिती संकलन आणि कारवाई आणखी प्रभावी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

६० किलो गांजाचा हा साठा म्हणजे केवळ एक कारवाई की मोठ्या तस्करीच्या साखळीचा धागा? याचे उत्तर पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहे. या प्रकरणात आणखी आरोपी किंवा तस्करीचे मोठे नेटवर्क उघडकीस येते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिरूरमध्ये अमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई वाढली ( Ganja Smuggling )

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत दिवटे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह संजय पड्याळ, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, ओंकार शिरोळे, सतीश मुंढे, सागर धुमाळ, संदीप खेडकर, एस. बी. गावडे, एस. डी. माळी, जे. एस. मचिंदर तसेच फॉरेन्सिक टीमचे प्रेम भालेराव व मुस्तकीम सय्यद यांच्या पथकाने केली.

शिरूरमध्ये गुन्हेगारीसोबत आता अमली पदार्थांच्या तस्करीचे आव्हानही समोर आले आहे. त्यामुळे ६० किलो गांजाच्या या कारवाईनंतर पोलिसांचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो आणि या साठ्यामागचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts