वाशिम। सचिन राणे, प्रतिनिधी
Washim Court Verdict: वाशिममध्ये महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक (Vaibhav Sarnaik) यांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले.
Washim Court Sentences Youth Congress Leader to Four Years in Jail: शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी वाशिमच्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती वैभव सरनाईक ( Vaibhav Sarnaik) यांना वाशिम जिल्हा ( Washim Court Verdict )व सत्र न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा (4-Year Jail Term) सुनावली आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय माळी (Sanjay Mali Assault Case) यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला. या शिक्षेमुळे वाशिम जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ( LS Marathi News Channel )
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावा
२०२३ मध्ये ही घटना (Washim Latest News) घडली होती. शासकीय कार्यालयात घडलेल्या या मारहाण प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींसोबतच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाचा पुरावा ठरले. साक्षीदारांच्या जबाबांसह उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे हे गुन्हे सिद्ध झाल्याचे मानले. त्यानंतर न्यायालयाने वैभव सरनाईक यांना चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. (Maharashtra Crime News)
पाच हजारांचा दंड; न भरल्यास अतिरिक्त कारावास
न्यायालयाने चार वर्षांच्या सश्रम कारावासासोबतच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे निकालात नमूद आहे. शासकीय अधिकाऱ्याला कार्यालयात मारहाण केल्याच्या या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले आणि सरकारी कामात अडथळा आणण्याच्या घटनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील न्यायालयीन निकाल आणि शिक्षेबाबत राजकीय वर्तुळासह स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.









