• Home
  • ताज्या बातम्या
  • पैसे नाहीत तर मुलीला जन्म का दिलाअसे म्हणत बीडमध्ये बेशुद्ध चिमुकलीला रुग्णवाहिकेतून उतरवले?
गुन्हा

पैसे नाहीत तर मुलीला जन्म का दिलाअसे म्हणत बीडमध्ये बेशुद्ध चिमुकलीला रुग्णवाहिकेतून उतरवले?

Beed Ambulance Controversy
14

Beed Ambulance Controversy : महाराष्ट्रात ज्या घटना घडणार नाही, त्या घटना सध्या बीडमध्ये घडताना दिसत आहेत…बिहारमध्ये काही पण होऊ शकतं असं आपण पूर्वी म्हणायचो….आता बीडमध्ये काही पण होऊ शकतं असं म्हणण्याची वेळ आली आहे….बीडमध्ये कधी भरदिवसा हत्या होते…तर कधी भरदिवसा हाणामारी पाहायला मिळते…बीडमध्ये महाराष्ट्रातील कायदे लागू होतात की नाही, असा प्रश्न निर्माण होतो…आता बीडमध्ये डिझेलच्या पैशांसाठी बेशुद्ध चिमुरडीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवले…म्हणजे बीडमध्ये अजून किती माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घडणार आहेत? असा प्रश्न निर्माण झालाय…बीडमध्ये नेमकं काय घडलं? चिमुकलीला का खाली उतरवण्यात आलं?

नेमकं काय घडलं बीडच्या माजलगाव तालुक्यात? ( Beed Ambulance Controversy )

बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचवीत शिकणाऱ्या मुलीला फिट आल्याने उपचारासाठी नेण्यात आले होते…. मुलगी बेशुद्ध असल्याने तिला पुढील उपचारासाठी रेफर लेटर देण्यात आले… खाजगी वाहनांसाठी पैसे नसल्याने मुलीच्या आजीने शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली…. रुग्णवाहिकेत मुलीला घेऊन वडील बसल्यानंतर आजीकडे डिझेलसाठी पैशांची मागणी करण्यात आली… आम्ही मोलमजुरी करून जगतो आमच्याकडे काहीच पैसे नाहीत असे उत्तर आजीने दिल्यानंतर डॉक्टरांनी थेट पैसे नाहीत, तर मुलीला पैदास का केले? असा संताप जनक सवाल केला… आणि रुग्णवाहिकेतून खाली उतरवले…

यानंतर हताश बापाने तिला खांद्यावर घेऊन दुसऱ्या रुग्णालयाकडे गेले…डॉक्टरांनी पैसे नाही तर मुलीला जन्मच का दिला असं म्हणताच वडीलांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली…बिचारे वडील एकदम हताश पाहायला मिळाले…एकीकडे दुष्काळाने शेतकऱ्याने ठार केले आहे…यंदा पाऊस न बरसल्याने शेतामध्येच पिकं उद्धवस्त झाली आहे…त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालाय…अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहे…असं असताना बीडमध्ये हताश बापाला थेट पैशासाठी सरकारी रूग्णवाहिकेतून उतरवण्यात येते…म्हणजे आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेन चालला आहे? असा प्रश्न आता निर्माण झालाय…

हेही वाचा : संभाजीनगर–नागपूर द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन शिक्षकांसह तिघांचा मृत्यू

वडिलांनी चिमुकलीला खांद्यावर घेऊन गाठले रुग्णालय ( Beed Girl Ambulance Case )

वडिलांनी मुलीला खांद्यावर उचलत रूग्णालयात नेले…त्यानंतर मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिला घरी नेण्यात आले…बिचाऱ्या चिमुकलीने 6 वर्षांपूर्वी आई गमावली आहे… कष्ट करून पोट भरणारी अनाथ लेक शासकीय रुग्णालयात बेशुद्ध पडते, आणि तिथली निर्दयी यंत्रणा तिच्या बापाकडे डिझेलच्या पैशांची लाच मागते, पैशांअभावी रुग्णवाहिका नाकारणाऱ्या या व्यवस्थेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे…दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे…

गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जाब विचारला असता डॉक्टरांनी माफी मागितली असून यापुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे…मात्र चक्क लाच मागत असं आजारी चिमुकलीला रुग्वाहिकेतून उतरवून देणं आणि त्यानंतर पैसे नाहीतर जन्मालाच का घातलं असं अपशब्द वापरण कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण झालाय…डॉक्टरांनी जरी माफी मागितली असली तरी असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून डॉक्टरावर कठोर कारवाई मागणी होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts