Ketan Agarwal Murder Case : निळ्या ड्रम’ हत्याकांड प्रकरणातील मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे…मुस्कानने सौरभ राजपूतशी लव्ह मॅरेज केली होती…पण मुस्कानने विवाह बाह्य संबंध ठेवत साहिलशी प्रेम प्रकरण सुरू केलं…आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असलेल्या सौरभला दोघांनी मिळवून अत्यंत क्रूरपणे संपवलं…त्यानंतर तुकडे तुकडे करत निळ्या ड्रममध्ये टाकलं…या घटनेने देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं…पण याप्रकरणी अखेर कोर्टाने न्याय देत दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे…यावेळी मुस्काने आपल्या मुलीची काळजी घ्या, अशी प्रतिक्रिया दिली…या घटनेनंतर आता केतन हत्या प्रकरणाची देखील चर्चा सुरू झाली आहे…सिया चेतनला देखील फाशी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला….
मुस्कान-साहिलला फाशी! सिया-चेतनला काय शिक्षा होणार? ( Ketan Agarwal Murder Case )
उत्तर प्रदेशातील मेरठमधील या हत्याकांड प्रकरणात पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने अनैतिक संबंधांमधून सौरभची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंट भरून लपवले होते…. कोर्टाने फाशीच्या शिक्षेचा निर्णय देताना स्पष्ट केले की, हा गुन्हायोजनबद्ध आणि अत्यंत क्रूर पद्धतीने केलेला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारचा गुन्हा असून, अशा गुन्हेगारांना समाजात कोणतेही स्थान असू शकत नाही…. न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुरुंगातून हजर असलेल्या दोन्ही दोषींना जेव्हा ही शिक्षा ऐकवण्यात आली, तेव्हा संपूर्ण परिसरात एकच शांतता पसरली होती… फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी हिने रडत रडत आपल्या मुलीची काळजी घेण्याची विनवणी न्यायालयाबाहेर केली… तर मृत सौरभ राजपूतच्या वृद्ध माता आणि भावाने न्यायालयातून बाहेर पडताना अश्रू ढाळत ‘आज आमच्या मुलाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला’ अशी भावना व्यक्त केली…
या प्रकरणातून प्रेमविवाह, विश्वासघात आणि विकृत क्रूरतेची एक भयंकर साखळी समोर येते… मृत सौरभ राजपूत हा मर्चंट नेव्हीत होता…2015 मध्ये त्याची मुस्कान रस्तोगी हिच्याशी भेट झाली होती आणि पुढे त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 2016 मध्ये सौरभ आणि मुस्कान यांचा मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह झाला… लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे अत्यंत सुखात गेली आणि 2029 मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव पीहू आहे… मात्र, याच काळात मुस्कानची तिच्या कॉलेजमधील जुना वर्गमित्र साहिल शुक्ला याच्याशी पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरू झाले… 2021 च्या सुमारास पती सौरभला आपल्या पत्नीच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली, ज्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले… वादाचे प्रमाण वाढल्याने सौरभने मुस्कानपासून वेगळे होण्यासाठी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि तो नोकरीच्या निमित्ताने लंडनला निघून गेला, अशी माहिती आहे… दरम्यानच्या काळात मुस्कान आणि साहिलने सौरभला आपल्या आयुष्यातून कायमचे संपवण्याचा कट रचला… फेब्रुवारी 2025 रोजी सौरभ आपल्या पत्नीच्या आणि मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लंडनहून मेरठला परतला… मात्र, त्याला कल्पना नव्हती की ज्या घरात तो जात आहे, तिथे त्याच्या मृत्यूचा सापळा आधीच रचला गेला आहे…
निळ्या ड्रम हत्याकांडात मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा ( Muskan Rastogi )
मार्च 2025 च्या रात्री मुस्कानने सौरभला जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले… पती पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच तिने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला रात्रीच घरी बोलावून घेतले… या दोघांनी मिळून झोपलेल्या सौरभवर चाकूने सपासप वार करून त्याची अत्यंत निर्घृण हत्या केली… एवढ्यावरच या नराधमांचा राक्षसी रागाचा शांत झाला नाही… त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे धारदार शस्त्राने तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी बाजारातून आणलेल्या एका मोठ्या निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ते तुकडे कोंबले… त्यानंतर दुर्गंधी सुटू नये म्हणून त्या ड्रममध्ये सिमेंट, वाळू आणि पाणी टाकून तो पूर्णपणे सील केला… हा गुन्हा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 4 मार्च रोजी मुस्कान आपल्या मुलीला आजोबांकडे सोडून प्रियकर साहिलसोबत हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे फिरायला गेली… सौरभच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांना तो ठीक असल्याचे बनावट मेसेज पाठवून त्यांनी तब्बल 13 दिवस सर्वांना अंधारात ठेवले… जेव्हा ते परतले आणि मृतदेह पूर्णपणे निकालात लावण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा सौरभच्या 6 वर्षांच्या मुलीने वडिलांची चौकशी सुरू केल्यामुळे मुस्कानची आई कविता रस्तोगी हिला संशय आला… शेवटी मुस्कानने स्वतःच्या आईसमोर गुन्हा कबूल केला आणि तिच्या आईनेच पोलिसांना सर्व घटना सांगितली… या खटल्याची तब्बल 13 महिने सुनावणी चालली, ज्यामध्ये 126 पेक्षा जास्त तारखा झाल्या आणि 22 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष नोंदवून आज न्यायालयाने या दोन्ही क्रूर गुन्हेगारांना सजा ए मौत सुनावली…
मेरठच्या या ऐतिहासिक निकालानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पुण्याच्या लोणावळ्याजवळील लोहागड किल्ल्यावर घडलेल्या ‘केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची’ जोरदार चर्चा सुरू झाली आहे… मेरठमध्ये ज्या प्रकारे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, अगदी तशाच प्रकारचा थरार पुणे ग्रामीण पोलिसांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उघडकीस आणला आहे… २६ वर्षीय केतन अग्रवालचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला असं सियाने म्हटलं आणि अपघाताचा बनाव केला…सिया गोयल ( Siya Goyal ), तिचा प्रियकर चेतन चौधरीने अत्यंत थंड डोक्याने चेतनची हत्या केली…पोलिसांनी नुकतीच या प्रकरणी न्यायालयासमोर तब्बल ५,०५३ पानांची महाकाय चार्जशीट दाखल केली आहे, ज्यामधील खुलासे वाचून संपूर्ण पोलीस दलही हादरून गेले आहे…
आरोपपत्रातील कथित कट आणि डिजिटल पुरावे
तिने सुरुवातीला बंगळुरूमध्ये केतनचे पाय तोडण्याचा आणि त्याला अपंग करण्याचा प्लॅन आखला….तो यशस्वी न झाल्याने तिने थेट त्याला जीवे मारण्याचा प्लॅन केला…त्यांनी गुगल आणि AI च्या मदतीने केतनला संपवण्याचे प्लॅन बनवायला सुरवात केली…आणि शेवटी ते यशस्वी झाले…म्हणजे मेरठ प्रकरणात जसं थंड डोक्याने कट रचण्यात आला, तसाच कट केतन हत्याकांडात देखील रचण्यात आला आहे…त्यामुळे आता निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणात कोर्टाने जो निर्णय दिला, त्याच निर्णयाच्या आधारे पुणे कोर्ट देखील निर्णय़ देणार का? कोर्ट आता सिया-चेतनला काय शिक्षा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे…









