Gold Resale : दिवाळी असो, दसरा असो किंवा घरातलं लग्नकार्य… भारतामध्ये घराघरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जाते… सोनं म्हणजे केवळ दागिना नाही, तर अडचणीच्या काळात उपयोगी पडणारी बचत, अशी अनेक कुटुंबांची धारणा आहे…ग्रामीण भागाकडे पैशाची गरज पडली की लगेच सोनं विकली जातं, किंवा त्याच्यावर कर्ज मिळवलं जातं… पण हेच सोनं आपण जेव्हा विकायला जातो, तेव्हा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो…कारण सोनं खरेदी करताना ग्राहकाला सोन्याच्या मूळ किमतीबरोबर घडणावळ, जीएसटी आणि काही वेळा इतर शुल्क भरावं लागतं. पण विक्री करताना या सगळ्या रकमा परत मिळतीलच असं नाही. त्यामुळे सोन्याचा भाव वाढला तरी ग्राहकाला अपेक्षित नफा मिळेलच याची खात्री नसते….सोन्याचे दर घसरले तर मोठा तोटा सहन करावा लागतो…
सोन्याची किंमत, घडणावळ आणि GST यांचा हिशेब (Gold Resale)
जर तुम्ही दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी गेलात आणि 1 लाख रूपयांचे दागिने बनवायचे ठरवले…तर त्यावर सोनाराने 15 टक्के घडणावळ आकारली, तर त्याचे आणखी 15 हजार रुपये होतात… आता एकूण रक्कम झाली 1 लाख 15 हजार रुपये… त्यावर 3 टक्के जीएसटी म्हणजे 3 हजार ४५० रुपये आकारले जातात… त्यामुळे 1 लाख रुपयांच्या सोन्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्षात 1 लाख १८ हजार ४५० रुपये मोजावे लागतात… म्हणजेच सोन्याची मूळ किंमत 1 लाख असताना ग्राहकाच्या खिशातून जवळपास साडेअठरा हजार रुपये अधिक जातात… दागिन्यांची रचना, सोनार आणि खरेदीच्या अटींनुसार घडणावळीचं प्रमाण वेगवेगळं असतं… काही दागिन्यांवर हे शुल्क कमी असू शकतं, तर अधिक नक्षीकाम असलेल्या दागिन्यांवर जास्तही असू शकतं.
पण खरी अडचण सुरू होते ती हेच दागिने पुन्हा विकायला गेल्यानंतर… समजा तुम्ही 1 लाख १८ हजार ४५० रुपये देऊन खरेदी केलेले दागिने काही दिवसांनी तुमच्यावर विकण्याची वेळ आली…तुम्हाला कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत… तुम्ही सोनाराकडे गेलात आणि सोन्याचे दर तुम्ही जेवढ्या दराने खरेदी केलेय तेवढंच आहे…तर तुम्हाला वाटेल आपण जेवढ्या पैशात दागिने खरेदी केलेत, तेवढेच पैसे परत मिळतील..पण असं नाही… तुम्ही भरलेले १५ हजार रुपयांचे घडणावळ शुल्क आणि 3 हजार ४५० रुपयांचा जीएसटी साधारणपणे परत मिळत नाही… म्हणजे सोन्याच्या भावात कोणतीही घसरण झाली नसतानाही तुम्हाला १८ हजार ४५० रुपयांचा फटका बसू शकतो. त्यात पुनर्खरेदी शुल्क किंवा इतर मान्य केलेली कपात असेल, तर हातात येणारी रक्कम आणखी कमी होऊ शकते.
हेही वाचा : Tesla Flying Car : एलॉन मस्कची उडणारी कार भारतात चालेल का? ट्रॅफिकमध्ये काय होणार?
दागिन्यांचं निव्वळ सोन्याचं वजन तपासणं का महत्त्वाचं? (Gold Making Charges)
तसंच शुद्धतेच्या नावाखाली दागिन्यांच्या वजनातील कपात… ग्राहकाने २२ कॅरेट सोन्याचा दागिना खरेदी केला असेल, तर त्यात साधारण ९१.६ टक्के सोनं असणं अपेक्षित असतं… म्हणूनच २२ कॅरेटच्या दागिन्यावर ९१६ असा हॉलमार्क असतो. मात्र काही वेळा जुना दागिना विकताना व्यापारी त्याची शुद्धता कमी असल्याचं सांगतात… समजा २२ कॅरेटचा दागिना २० किंवा २१ कॅरेटचा असल्याचं सांगून कमी किंमत देतात…त्यामुळेही मोठा तोटा सहन करावा लागतो…
हा तर सोन्याचं दर स्थिर असतानाचं गणित आपण पाहिलंय…पण जर सोन्याचं दर 10 टक्क्यांनी घसरला तर… अशा वेळी त्याच सोन्याची किंमत साधारण 90 हजार रुपये राहील. त्यावर व्यापाऱ्याने आणखी तीन टक्के पुनर्खरेदी कपात केली, तर ग्राहकाच्या हातात सुमारे ८७ हजार ३०० रुपये पडतील. म्हणजे खरेदीवेळी खर्च केलेल्या रकमेच्या तुलनेत जवळपास ३१ हजार १५० रुपयांचं नुकसान होईल…
म्हणजे या ठिकाणी व्यापारी आणि सरकारचाच फायदा होताना दिसत आहे…ग्राहकांना मात्र तोटा सहन करावं लागत आहे…यामुळे आता सामान्य ग्राहकाने सोनं खरेदी करणंच बंद करावं का? याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजेवर अवलंबून आहे. लग्नासाठी किंवा वापरण्यासाठी दागिने खरेदी करणं आणि केवळ पैसे गुंतवण्यासाठी सोनं खरेदी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वापरासाठी दागिने घेताना त्यांच्या सौंदर्याला आणि कारागिरीला महत्त्व असतं. मात्र गुंतवणुकीच्या उद्देशाने दागिने खरेदी केल्यास घडणावळ आणि पुनर्विक्रीतील कपातीमुळे परतावा कमी होऊ शकतो. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी घडणावळ किती आहे, सोन्याची शुद्धता किती आहे, दागिन्याचं निव्वळ सोन्याचं वजन किती आहे आणि पुन्हा विकल्यास किती रक्कम मिळेल, हे स्पष्टपणे विचारणं गरजेचं आहे.









