• Home
  • Top News
  • मित्राशी प्रेमसंबंध, मुलगी गर्भवती, हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?
गुन्हा

मित्राशी प्रेमसंबंध, मुलगी गर्भवती, हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

Amravati Baby Sale Case
4

Amravati Baby Sale Case : डॉक्टर… ज्यांना आपण देवाचं रूप मानतो. रुग्णालयात गेल्यावर ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्यांनीच जर मानुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर? महाराष्ट्राच्या अमरावती शहरातून एक अशीच अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ४ दिवसांच्या, निष्पाप, नवजात बाळाचा सौदा झाला….. आणि हा सौदा कोणी इतर दलालाने नाही, तर चक्क एका सुशिक्षित डॉक्टर दाम्पत्याने केला. या चिमुरड्या जीवाची किंमत लावली गेली… ३ लाख ५० हजार रुपये… पण म्हणतात ना, पाप कधी ना कधी उघडकीस येतंच. या प्रकरणातही असंच काहीसं घडलं. एका नाट्यमय घडामोडीत या संपूर्ण काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला. नेमकं हे प्रकरण काय आहे? हा धक्कादायक सौदा कोणी आणि का केला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा कसा झाला?

अमरावतीत चार दिवसांच्या नवजात बाळाच्या कथित विक्रीप्रकरणाने खळबळ (Amravati Baby Sale Case)

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते एका अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या वळणावर. अमरावती शहरात राहणारी एक अवघी १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी , वय खेळण्या-बागडण्याचं, पण एका चुकीच्या नात्यामुळे ती गरोदर राहिली. गर्भधारणेनंतर मुलगी राजापेठ परिसरातील महिला डॉक्टर वैशाली भोजने यांच्याकडे तपासणीसाठी गेली होती. तपासणीदरम्यान मुलगी सुमारे 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. मुलीचे वय कमी असल्याने कुटुंबीयांनी बाळ नको असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यावर बाळ अनाथाश्रमाला दान करण्याची व्यवस्था करता येईल, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचा उपचार महिला डॉक्टरांनी केला. 15 ऑक्टोबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. संबंधित महिला डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना रुग्णालयात बोलावले होते. त्यावेळी शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुख वर्षा भोयर आणि युवती सेना प्रमुख कोमल बद्रे या दोन महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या. या पदाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टर नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री करत असल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी डॉक्टरांच्या पतीने पीडित कुटुंबीयांना सत्य सांगू नये, अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबीयांना रुग्णालयातून सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा : नूडल्स खाल्ले आणि पाच जणांचा मृत्यू; ग्रेटर नोएडात नेमकं काय घडलं?

प्रकरणात POCSO कायद्यासह कोणत्या तरतुदी लागू झाल्या? ( POCSO Case )

घटनेचं गांभीर्य ओळखून फ्रेझरपुरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यामध्ये आरोपी महिला डॉक्टर, तिचा पती आणि पीडित मुलीचा अल्पवयीन प्रियकर या तिघांवरही गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो कायदा आणि बाल तस्करी सारख्या अत्यंत कडक आणि अजामीनपात्र कलमांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने ते आरोपी डॉक्टर दाम्पत्य रुग्णालयाला कुलूप लावून फरार झाले आहे. पोलीस सध्या वेगवेगळ्या पथकांद्वारे या फरार डॉक्टरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी त्या अल्पवयीन प्रियकराला तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे, ते ४ दिवसांचे नवजात बाळ सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. पोलीस आणि बाल कल्याण समितीच्या (Child Welfare Committee) देखरेखीखाली त्याची काळजी घेतली जात आहे.

अमरावतीच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. पण या घटनेमुळे समाज म्हणून आपल्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, पैशांच्या हव्यासापोटी डॉक्टरकीसारख्या पवित्र पेशाला काळीमा फासणारे हे रॅकेट किती मोठं असू शकतं? या डॉक्टर दाम्पत्याने यापूर्वीही अशी बाळं विकली आहेत का? आणि आपल्या समाजात अल्पवयीन मुलांमधील अनैतिक संबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर आपण कधी उघडपणे बोलणार आहोत का? जर त्या मुलीच्या कुटुंबाला कायद्याची आणि समुपदेशनाची मदत मिळाली असती, तर कदाचित ते या डॉक्टरांच्या जाळ्यात अडकले नसते.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts