Goa LPG Cylinder Scheme: गोवा सरकारने पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. वर्षाला तीन LPG सिलेंडरसाठी आता तीन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून, या तारखेपासून अर्ज करता येणार आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पप्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन एलपीजी सिलेंडर (Goa LPG Cylinder Scheme) घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात या योजनेची माहिती दिली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून करण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून ही योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांना ५ सप्टेंबरपासून अर्ज करता येईल. अर्जाचे नमुने संबंधित पंचायत कार्यालय तसेच आमदारांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज साद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. LS Marathi News Channel
कोणती कागदपत्रे आवश्यक?
योजनेचा (Goa LPG Cylinder Scheme) लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये बँक पासबुक, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्राची प्रत सादर करावी लागणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ९ सप्टेंबरपासून 3,000 रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या रकमेतून लाभार्थी वर्षभरातील तीन एलपीजी सिलेंडरच्या खर्चाची पूर्तता करू शकतील.
2022 मधील आश्वासनाची पूर्तता
2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या Goa LPG Cylinder Scheme) वेळी भाजपने पात्र नागरिकांना दरवर्षी तीन एलपीजी सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. आता थेट आर्थिक मदतीच्या माध्यमातून हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले आहे.
दरम्यान, गोवा विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2022 च्या निवडणुकीत भाजपने 40 पैकी 27 जागांवर विजय मिळवत राज्यात सरकार स्थापन केले होते. आता आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



