Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • गुन्हे शाखेची मोठी कारवाई! 1.45 लाखांचा अवैध दारू साठा जप्त, महिला गुन्हा दाखल
Pune

गुन्हे शाखेची मोठी कारवाई! 1.45 लाखांचा अवैध दारू साठा जप्त, महिला गुन्हा दाखल

Illegal liquor seized by Crime Branch

Illegal liquor seized by Crime Branch : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट४ ने अवैध दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीतून तब्बलहजार ९०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन जप्त केले आहे. या कारवाईत सुमारेलाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, या प्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिटहे अवैध व्यवसायावर लक्ष ठेवून पेट्रोलिंग करत होते. त्यांना गुप्त बातमीदार यांच्यामार्फत शिरगाव परिसरातील एका ओढ्याच्या कडेला हातभट्टी दारूसाठी गुळमिश्रित रसायन भिजत घातल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात रसायन साठा हस्तगत केला.

हेही वाचा – दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार; दोघे गंभीर

या छाप्यात २ हजार ९०० लिटर गुळमिश्रित रसायन, अंदाजे १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा प्रोव्हिबिशन मुद्देमाल आढळून आला. हा संपूर्ण साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी चंपा सनी कर्मावत, रा. भोंडवे वस्ती, किवळे, ता. हवेली, जि. पुणे या महिला आरोपीविरुद्ध शिरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा युनिट४, पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अवैध दारूविरोधातील पोलिसांची मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात अवैध दारू विक्रीला आळा बसतो का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts