Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • दिल्ली हादरली! एसी स्फोटानंतर भीषण आग; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Top News

दिल्ली हादरली! एसी स्फोटानंतर भीषण आग; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

delhi 1

Delhi Fire Accident: राजधानी दिल्लीत रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली असून एसीच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शाहदरा परिसरातील विवेक विहार येथील एका निवासी इमारतीत पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एसीचा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने काही क्षणांतच संपूर्ण इमारतीला वेढले.

हेही वाचा: शिरखुर्म्या, पेयातून गुंगीचं औषध देऊन महिलांसोबत आरोपींनी नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात SIT तपासातून माहिती समोर

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी ६.२० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ४ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बचावकार्य राबवत सुमारे १४ ते २० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. सुरुवातीला काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र पोलिसांनी सध्या आत कोणीही अडकलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्मण झाले असून प्रशासनाकडून घटनेच्या कारणांचा सखोल तपस सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts