Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिरखुर्म्या, पेयातून गुंगीचं औषध देऊन महिलांसोबत आरोपींनी नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात SIT तपासातून माहिती समोर
Top News

शिरखुर्म्या, पेयातून गुंगीचं औषध देऊन महिलांसोबत आरोपींनी नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात SIT तपासातून माहिती समोर

Nashik TCS Case: टीसीएस (TCS) कंपनीशी संबंधित महिलांच्या लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून तपासात सतत नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपस पथकाने (STI) केलेल्या चौकशीत आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे कृत्य केल्याचे संकेत मिळाले आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलांना विश्वासात घेऊन शिरखुर्मा तसेच थंड पेयांमध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळून दिल्याचा संशय आहे. या पदार्थाच्या प्रभावाखाली असताना महिलांवर लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

हेही वाचा: 4 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर ठेवून रास्ता रोको; मुंबई-बंगळुरू महामार्ग सुमारे 5 तास बंद

याशिवाय, या महिलांचे मनपरिवर्तन करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे केवळ गुन्हेगारी नव्हे तर एका मोठ्या स्वरूपाच्या योजनेचा संशय व्यक्त केला जात आहे.

SIT च्या तपासात काही आर्थिक व्यवहारांबाबतही संशय निर्माण झाला आहे. बँक व्यवहार आणि KYC कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान धर्मांतराच्या प्रक्रियेसाठी बाहेरील स्त्रोतांकडून आर्थिक मदत मिळाल्याचे संकेत मिळाले असून, या निधीचा मूळ स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित निदा एजाज खान हिचा अटकापूर्व जमीन अर्ज नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सादर केलेल्या युक्तिवादानंतर आणि SIT च्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिला दिलासा नाकारला आहे. ती सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे.

इतर आरोपींमध्ये तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आसिफ अन्सारी, शफी शेख आणि कंपनीतील असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाकडून सुरू असून आगामी काळात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts