Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नाशिक प्रकरणात नवा ट्विस्ट; TCS कंपनीची फरार HR निदा खान प्रेग्नेंट, झाला धक्कादायक खुलासा
Top News

नाशिक प्रकरणात नवा ट्विस्ट; TCS कंपनीची फरार HR निदा खान प्रेग्नेंट, झाला धक्कादायक खुलासा

nida khan
73

Nashik TCS Company Case | नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Nashik TCS Company) या कंपनीत अनेक महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एक महिला आणि सात पुरूष आरोपींना अटक केली आहे. तसेच सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली एचआर निदा खान (HR Nida Khan) ही अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. अशातच आता फरार एचआर निदा खानबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

हेही वाचा – “…म्हणून रोहित शेट्टीच्या घराबाहेर केला गोळीबार”, आरोपीने दिली कबुली, सांगितलं धक्कादायक कारण

या प्रकरणातील संबंधित कंपनीची एचआर मॅनेजर निदा खानबाबत पीडित कर्मचाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. एचआर निदा खान हीचा कंपनीत मोठा दबदबा होता. तिला सर्व कर्मचारी ‘दबंग मॅम’ म्हणत होते. तसेच कंपनीत तिचा दरारा इतका जास्त होता की प्रत्येकजण तिला घाबरत होतं, अशी माहिती देत पीडित कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात निदा खानविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर अनेक आरोप केले आहेत.

आरोपी HR निदा खान प्रेग्नेंट?

निदा खान ही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा छळ करत होती. ती कंपनीच्या टीम लीडर्ससोबत मिळून महिला कर्मचाऱ्यांचा छळ करायची आणि त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होती. ती महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी धर्माचं पालन कसं करायचं, कपडे कसे घालायचे, बुरखा कसा घालायचा या गोष्टी शिकवत होती आणि त्यांना ते जबरदस्तीने करायला भाग पाडत होती, असा दावा पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच आरोपी निदा खान ही मागील काही दिवसांपासून फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. यादरम्यान आता निदा खानबाबत मोठा खुलासा झाला आहे.

आरोपी निदा खान ही गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ती मुंबईत राहत असून लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच निदा खानने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

फरार निदा खानने नाशिकच्या स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. तर या अटकपूर्व जामीन अर्जात निदाने वैद्यकीय परिस्थीतीचा हवाला दिला असून त्या आधारावर तिने अटकपूर्व जामीन देण्याची मागणी केली आहे. तर आता निदाच्या या अर्जावर कोर्टात काय निर्णय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts