Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
Mumbai

मोठी बातमी! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

मोठी बातमी! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
60

Fire Breaks Out : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या आसनव्यवस्थेच्या भागात आग लागली. ही घटना गुरुवारी सायंकाळीच्या सुमारास घडल्याचं वृत्त आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग कशी लागली? :

मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनलच्या केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आग टर्मिनलच्या तळमजल्यापुरतीच मर्यादित होती. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी आग विझवण्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

 

हेही वाचा : मध्य पूर्वेत घडामोडींना वेग; ब्रिटिश पंतप्रधान यूएईमध्ये दाखल, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर होणार निर्णायक बैठक

 

मुंबई विमानतळावरील आगीचा व्हिडिओ व्हायरल :

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या आसनव्यवस्थेच्या भागातील आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या आत दाट धूर दिसत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आग टर्मिनलच्या तळमजल्यापुरतीच मर्यादित :

विशेष म्हणजे ही आग टर्मिनलच्या तळमजल्यापुरतीच मर्यादित असल्याचं सांगण्यात येत आहे. आग विझवण्याच्या कामात मदत करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलंय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच विमानतळाच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर त्यांना मुंबई अग्निशमन दलाकडून अतिरिक्त मदतीची मागणी करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts