Jamui Minor Girl Case : हेच ते बिहार आहे, हेच ते भाजपाचे अच्छे दिन आहेत…हा संताप आणणारा व्हिडिओ समोर आला आणि बिहारवर पुन्हा एकदा संपूर्ण देश संतापला, बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन जोडप्यासोबत रस्त्यावर झालेल्या अत्यंत संतापजनक आणि अमानुष छेडछाडीच्या घटनेनंतर संपूर्ण देशात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. याच प्रकरणात २२ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत मुख्य आरोपी नंदन यादव आणि त्याचा साथीदार हरेराम यादव यांच्या पायावर गोळ्या झाडून पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत बेड्या ठोकल्या. पण या धक्कादायक घटनेनंतर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनता दल सरकारवर ‘हेच का तुमचे अच्छे दिन’ म्हणत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
जमुईतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई ( Jamui Minor Girl Case )
ही संपूर्ण घटना जमुई-लखीसराय रस्त्यावर घडली, जिथे दहावीत शिकणारे एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी आपल्या कोचिंग क्लासवरून दुचाकीने घरी परतत होते. त्याच वेळी काही स्थानिक गुंडांच्या टोळक्याने त्यांना एका निर्जन टेकडीजवळ थांबवले आणि त्यांचे रस्ते अडवले. या विकृत टोळक्याने अल्पवयीन मुलीची छेड काढायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. जेव्हा तिच्यासोबत असलेल्या मित्राने या कृत्याला विरोध केला, तेव्हा त्या तरुणांनी मुलाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. तब्बल २० मिनिटांपेक्षा जास्त काळ हा प्रकार सुरू होता, ज्यामध्ये ती मुलगी हात जोडून आणि रडून गुंडांकडे स्वतःला आणि तिच्या मित्राला सोडून देण्याची भीक मागत होती. त्या गुंडांनी संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो इंटरनेटवर प्रसारित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरल्याने लोकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला.
हेही वाचा : सत्तरीतलं प्रेम, आजीनं केला आजोबांचा गेम मृतदेह जाळला आणि शेतात पुरला!
मुख्य आरोपी नंदन यादवला पोलिस कारवाईत पायाला गोळी ( Nandan Yadav )
व्हिडिओ व्हायरल होताच झोपलेले बिहार पोलीस जागे झाले आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पोलिसांवर गोळीबार करून किंवा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आत्मरक्षणासाठी आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात मुख्य आरोपी नंदन यादव ( Nandan Yadav ) याच्या पायाला गोळी लागली आणि तो जमिनीवर कोसळला. अशी स्टोरी आता पोलिसांकडून रंगवण्यात येतेय, याच कारवाई दरम्यान दुसरा फरार आरोपी हरेराम यादव याच्याही पायाला गोळी लागल्याने त्याचे पाय फ्रॅक्चर झाले. पोलिसांनी या दोघांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेऊन तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आतापर्यंत पोलिसांनी एकूण ५ ते ८ संशयितांना अटक केली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या या ‘हाफ एन्काउंटर’ कारवाईनंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह संपूर्ण महागठबंधनाने नितीश कुमार आणि भाजपच्या महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, जर बिहारमध्ये खरोखरच सुशासनाचे आणि भाजपचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, तर मग राज्यामध्ये रात्री सात वाजता एका मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या अल्पवयीन मुली आणि विद्यार्थी सुरक्षित का नाहीत. विरोधकांच्या मते, ही घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट लक्षण असून बिहारमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज सक्रिय झाले आहे.








