• Home
  • गुन्हा
  • बीड हादरलं! नवऱ्यासोबत झोपलेल्या विवाहितेला घरातून उचलून नेलं, लैंगिक अत्याचार करून गावाच्या चावडीवर बांधलं
Top News

बीड हादरलं! नवऱ्यासोबत झोपलेल्या विवाहितेला घरातून उचलून नेलं, लैंगिक अत्याचार करून गावाच्या चावडीवर बांधलं

Beed Sexual Assault

Sexual assault : एखाद्या सिनेमालाही लाजवेल असे घाणेरडे कृत्य बीडच्या हिवरापहाडी गावात घडले आहे. नवऱ्यासोबत रूमध्ये झोपलेल्या एका विवाहितेला एका नराधमाने घरातून जबरदस्तीने उचलून तिला गावच्या नदीवर घेऊन गेला. आणि तिच्यावर बळजबरीने आत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने तिला गावाच्या चावडीवर नेत दोरीने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून नक्कीच बीडचं बिहार झालंय असं म्हणता येईल. ही घटना बीडच्या (Beed Crime News) हिवरापाडी गावात घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, १० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत रुममध्ये झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावाच्या चावडीवर दोरीनं बांधून ठेवलं

घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवलं आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडवून घरी नेलं.

वैभव पटेकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र शेवटी तिने हिम्मत करून आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने वैभव पटेकर या व्यक्तीवर गंभीर आरोप केले असून त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली. वैभव पटेकर याला ताब्यात घेण्यात आले. पीडितेने अधिकृत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलिस व पिंक पथकाकडून सुरू आहे.

चावडीसमोर बांधून ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल

या तरुणीला गावच्या चावडीसमोर बांधून ठेवल्याचा जो व्हिडीओ आहे, त्यामध्ये तिच्या हाताला आणि पायाला दोरखंड बांधल्याचे दिसत आहे. पोलीस चौकशीत ही विवाहित तरुणी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या पीडित तरुणीची आणि आरोपीची चौकशी करत आहेत. या चौकशीतून आता कोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts