• Home
  • ताज्या बातम्या
  • या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… , मुरलीधर मोहोळ रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
Pune

या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… , मुरलीधर मोहोळ रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

mohol

Murlidhar Mohol | केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुण्यातील (Pune) एका खासगी रूग्णालयात महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. याबाबतची माहिती स्वत: मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

“मोजतबा खामेनेई जिवंत नाही, जर ते जिंवत असतील तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य

मुरलीधर मोहोळ यांना नेमकं झालं काय?

29 वर्षांपूर्वी कुस्तीच्या मैदानात झालेली दुखापत आता पुन्हा एकदा उद्भवल्याने मुरलीधर मोहोळ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, क्षमस्व, पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! 29 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता 29 वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती का सोडली?

दरम्यान, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे कुस्तीगीर होते. तर 29 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळत असताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्यांचं कुस्तीचं स्वप्न अर्धवट राहिलं आणि त्यांना कुस्ती सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांनी या जखमेच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण, मागील काही दिवसांपासून त्यांना त्रास होऊ लागला. नंतर रूग्णालयात दाखल होत डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आता मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांनी डिस्चार्ज देखील दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts